क्रिकेटचे आणि चित्रपटसृष्टीचे जुने नाते आहे. क्रिकेटपटू आणि मनोरंजन क्षेत्रातील कलाकार नेहमीच एकमेकांच्या पोस्टवर कमेंट करताना दिसतात. असेच काहीसे घडले आहे, मराठमोळी अभिनेत्री सायली संजीवच्या बाबतीत. अभिनेत्री आता तिच्या एका कमेंटमुळे चर्चेत आली आहे.
बुधवारी (२८ एप्रिल) चेन्नई सुपर किंग्स आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यामध्ये आयपीएलचा २०२१ चा २३ वा सामना खेळला गेला. हा सामना चेन्नईच्या संघाने ७ विकेट्सने जिंकला. त्यातही क्रिकेटपटू ऋतुराज गायकवाडने अफलातून खेळी केली. त्याने या सामन्यात ४४ चेंडूत ७५ धावा कुटल्या. यामध्ये १२ चौकारांचा समावेश होता. उत्तम कामगिरी बजावत त्याने प्रेक्षकांची मने जिंकली.
त्यानंतर ऋतुराजने सामन्यादरम्यानच्या एक फोटो, आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवर शेअर केला. या फोटोवर त्याच्या चाहत्यांसोबतच, मराठमोळी अभिनेत्री सायली संजीवनेही कमेंट केली आहे. फोटोवर कमेंट करत अभिनेत्रीने लिहिले, “वाह, वाह!” यासह तिने लाल हार्ट इमोजीही पोस्ट केले आहेत. आता तिची ही कमेंट सोशल मीडियावर नेटकऱ्यांचे लक्ष वेधून घेत आहे.
झी मराठी चॅनलवरील ‘काहे दिया परदेस’ मालिकेत सायलीने ‘गौरी’ची भूमिका साकारली होती. ‘गौरी’ची भूमिका साकारत, अभिनेत्रीने प्रेक्षकांच्या मनात अढळ स्थान निर्माण केले. त्यानंतर अभिनेत्रीने चित्रपटसृष्टीही पाऊल ठेवले. तिने ‘पोलिस लाईन’, ‘आटपाडी नाईट्स’, ‘मन फकीरा’, ‘सातारचा सलमान’, ‘एबी आणि सीडी’, ‘झिम्मा’, ‘गोष्ट एका पैठणीची’ अशा मराठी चित्रपटामध्ये अभिनय करून रसिकांची मने जिंकली.
ऋतुराजबद्दल बोलायचे झाले, तर आतापर्यंत त्याने केवळ १२ आयपीएल सामने खेळले आहेत. त्यात त्याने ३९.६ च्या सरासरीने ३९६ धाव केल्या आहेत. यामध्ये ५ अर्धशतकांचा समावेश आहे. त्याची आयपीएलमधील सर्वाधिक धावसंख्या ही ७५ आहे.
दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-
-कोरोनाच्या समोर सोनू सूदही झाला असहाय्य! ट्वीट करत म्हणाला, ‘दिल्लीमध्ये देव शोधणे सोपे, पण…’
-‘मी शांत बसणार नाही…’, आमिर खानसोबत काम केलेल्या अभिनेत्याला जीवे मारण्याची धमकी, भाजपवर मोठा आरोप










