Friday, July 5, 2024

तुला पाहून याडं लागलं..! सायली संजीवचा रोमॅंटिक व्हिडिओ होतोय सोशल मीडियावर व्हायरल

मराठी सिनेसृष्टीतील अभिनेत्रींचे भन्नाट फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. या फोटो आणि व्हिडिओला प्रेक्षकांचाही जोरदार प्रतिसाद पाहायला मिळत असतो. सध्या मराठी अभिनेत्री सायली संजीवचाही असाच एक रोमॅंन्टिक व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. या व्हिडिओवर प्रेक्षकांच्या जोरदार प्रतिक्रिया पाहायला मिळत आहेत. कोणता आहे तो व्हिडिओ, आणि कोण आहे तो अभिनेता चला जाणून घेऊ. 

सायली संजीव (Sayali Sanjiv) ही मराठी सिनेसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री म्हणून ओळखली जाते. आपल्या सहजसुंदर अभिनयाने आणि घायाळ करणाऱ्या सौंदर्याने सिने जगतात स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. आपल्या अभिनयाइतकीच ती सोशल मीडियावरही चांगलीच सक्रिय असते. सोशल मीडियावरुन ती तिचे अनेक व्हिडिओ आणि फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते. सध्या सायलीची असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान चर्चेत आला आहे. या व्हिडिओमध्ये ती अभिनेता नितेश चव्हाणसोबत रोमॅंटिक डान्स करताना दिसत आहे.

सायलीने हा व्हिडिओ आपल्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवरुन शेअर केला आहे. तुला पाहून याडं लागलं असे या गाण्याचे बोल असून सायली आणि नितीशच्या सुंदर केमिस्ट्रीमुळे हा व्हिडिओ नेटकऱ्यांना चांगलाच भुरळ घालताना दिसत आहे. व्हिडिओवर चाहत्यांच्या जोरदार प्रतिक्रिया पाहायला मिळत आहेत. तत्पुर्वी सायली आणि अभिनेता नितीश चव्हाणचे तुला पाहुन हे गाणे नुकतेच प्रेक्षकांच्या भेटीला आले होते. या गाण्याला प्रेक्षकांचा जोरदार प्रतिसाद पाहायला मिळाला होता. याच गाण्यावर सायली आणि नितीशने हे रिल तयार केले आहे, जे सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

 

 

View this post on Instagram

 

A post shared by Nitish Chavan (@nitish__chavan)

 

दरम्यान, अभिनेत्री सायली संजीवच्या ‘गोष्ट एका पैठणीची’ या चित्रपटाला नुकताच राष्ट्रीय पुरस्कार मिळाला होता. तेव्हापासून तिच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. त्याचबरोबर सायलीच्या एका पोस्टवर कमेंट केल्याने क्रिकेटपटू ऋतुराज गायकवाड आणि सायलीच्या प्रेमप्रकरणाचीही जोरदार चर्चा रंगली होती.

हेही वाचा-

‘द्वेषाचा सामना करावा लागतोय’, ‘शमशेरा’ फ्लॉप झाल्याने व्यथित झाला अभिनेता संजय दत्त

रणवीरला ट्रोल करणाऱ्यांवर भडकल्या महिला आयोगाच्या प्रमुख स्वाती; म्हणाल्या, ‘महिला जेव्हा नग्न होतात…’

साऊथच्या चित्रपट कथेलाही लाजवेल अशी आहे अभिनेता सुदीपची लवस्टोरी, आधी घेतला घटस्फोट अन पुन्हा…

हे देखील वाचा