छोट्या पडद्यावरून चित्रपटात पदार्पण करण्यासाठी कलाकारांना अनेक वर्षे मेहनत करावी लागते, अभिनयाच्या कसोटीला उतरावे लागते. पण काही अभिनेत्री अशा असतात की, त्या खूप कमी कालावधीत त्यांचा हा टप्पा पार करतात. याच यादीतील एक नाव म्हणजे सायली संजीव. ‘काहे दिया परदेस’ या मालिकेतून टेलिव्हिजनवर पदार्पण करणाऱ्या या अभिनेत्रीने आता चित्रपटसृष्टीतही तिचे एक अढळ स्थान निर्माण केले आहे. तिच्या अभिनयासोबत तिच्या सौंदर्याचे नेहमीच कौतुक होत असते. सोशल मीडियावर ती चाहत्यांशी जोडून असते. अशातच तिचा साडीमधील एक व्हिडिओ समोर आला आहे.
सायलीने अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवरून तिचा एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये तिने गुलाबी रंगाची एक सुंदर पैठणी नेसली आहे. यावर तिने हिरव्या रंगाचा स्लीव्हलेस ब्लाऊज घातला आहे. तसेच गळ्यात एक चेन आणि नाकात नथ घातली आहे. यासोबत तिने कपाळावर छोटीशी टिकली लावली आहे. या व्हिडिओमध्ये ती साडीसोबत पोझ देताना दिसत आहे. ज्यामध्ये ती अत्यंत सुंदर दिसत आहे. (Marathi actress sayali sanjeev share her saree look video on social media)
तिचा हा व्हिडिओ पाहून तिच्या एका चाहत्याने यावर कमेंट केली आहे की, “तुझ्या डोळ्यात आहे माझ्या प्रेमाचे गीत. तुझ्या हसण्यात आहे माझं आवडतं संगीत.” यासोबत एक चाहत्याने कमेंट केली आहे की, “तुला पाहिल्यावर मला एकच फिलिंग येते, प्रेम.”
आणखी एका चाहत्याने या व्हिडिओवर कमेंट केली आहे की, “सायली काय ऋतुराजला बॅटिंगवर लक्षकेंद्रित करून देणार नाही.” त्याची ही कमेंट लक्षवेधी ठरत आहे. काही दिवसांपूर्वी भारतीय क्रिकेटर ऋतुराज गायकवाड आणि सायली संजीव हे दोघे ही सोशल मीडियावर एकमेकांच्या पोस्ट लाईक करून कमेंट देखील करत होते. त्यामुळे ते दोघे रिलेशनमध्ये आहे अशा जोरदार चर्चा चालू होत्या.
सायलीच्या कामाबद्दल बोलायचे झाल्यास, ‘काहे दिया परदेस’ मालिकेत सायलीने गौरीची भूमिका साकारली होती. गौरीची भूमिका साकारत, अभिनेत्रीने प्रेक्षकांच्या मनात अढळ स्थान निर्माण केले. त्यानंतर अभिनेत्रीने चित्रपटसृष्टीतही पाऊल ठेवले. तिने ‘पोलीस लाईन’, ‘आटपाडी नाईट्स’, ‘मन फकीरा’, ‘सातारचा सलमान’, ‘एबी आणि सीडी’, ‘झिम्मा’, ‘गोष्ट एका पैठणीची’ अशा मराठी चित्रपटामध्ये अभिनय करून रसिकांची मने जिंकली आहे. सायलीने कलर्स मराठीवरील ‘शुभमंगल ऑनलाईन’ या मालिकेत सुयश टिळकसोबत काम केले आहे. या मालिकेने नुकतेच प्रेक्षकांचा निरोप घेतला आहे.
दैनिक बोंबाबोंचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-
–बॉलिवूडचे ‘हे’ मोठे सिनेमे ठरले नुसताच फुसका बार, कमाईतून बजेट वसूल करणे देखील झाले मुश्किल
–बॉलिवूडच्या ‘या’ दिग्गज अभिनेत्रींनी लग्नानंतर त्यांच्या यशस्वी चित्रपटांच्या करिअरला ठोकला रामराम










