Friday, June 13, 2025
Home मराठी मराठमोळ्या सायली संजीवने ‘या’ गाण्यावर दिले अफलातून एक्सप्रेशन्स; पाहून तुम्हीही व्हाल घायाळ

मराठमोळ्या सायली संजीवने ‘या’ गाण्यावर दिले अफलातून एक्सप्रेशन्स; पाहून तुम्हीही व्हाल घायाळ

छोट्या पडद्यावरून चित्रपटात पदार्पण करण्यासाठी कलाकारांना अनेक वर्ष मेहनत करावी लागते. अभिनयाच्या कसोटीला उतरावे लागते, पण काही अभिनेत्री अशा असतात की, त्या खूप कमी कालावधीत त्यांचा हा टप्पा पार करतात. याच यादीतील एक नाव म्हणजे सायली संजीव. ‘काहे दिया परदेश’ या मालिकेतून टेलिव्हिजनवर पदार्पण करणाऱ्या या अभिनेत्रीने आता चित्रपटसृष्टीत तिचे एक अढळ स्थान निर्माण केले आहे. तिच्या अभिनयासोबत तिच्या सौंदर्याचे नेहमीच कौतुक होत असते. सोशल मीडियावर ती चाहत्यांशी जोडून असते. अशातच तिचा एक व्हिडिओ समोर आला आहे.

सायलीने नुकताच सोशल मीडियावर तिचा एक व्हिडिओ शेअर केला आहे. ज्यामध्ये ती एका गाण्यावर हावभाव करताना दिसत आहे. या व्हिडिओमध्ये ती ‘दॅट्स ऑल रिअली वॉना डू’ या गाण्यावर हावभाव करताना दिसत आहे. या व्हिडिओमध्ये तिने काळ्या रंगाचा टी-शर्ट परिधान केला आहे. या व्हिडिओमध्ये तिचे हावभाव खूपच छान आहेत. (Marathi actress sayali Sanjeev’s video viral on social media)

तिचे अनेक चाहते या सुंदर व्हिडिओवर प्रतिक्रिया देत आहेत. तिच्या एका चाहत्याने “बेस्टम बेस्ट… देखू तुझे… दिल डुबा रहे,” अशी कमेंट केली आहे. तसेच बाकी अनेक चाहते हार्ट ईमोजी पोस्ट करत आहेत.

‘काहे दिया परदेस’ मालिकेत सायलीने गौरीची भूमिका साकारली होती. गौरीची भूमिका साकारत, अभिनेत्रीने प्रेक्षकांच्या मनात अढळ स्थान निर्माण केले. त्यानंतर अभिनेत्रीने चित्रपटसृष्टीही पाऊल ठेवले. तिने ‘पोलीस लाईन’, ‘आटपाडी नाईट्स’, ‘मन फकीरा’, ‘सातारचा सलमान’, ‘एबी आणि सीडी’, ‘झिम्मा’, ‘गोष्ट एका पैठणीची’ अशा मराठी चित्रपटांमध्ये अभिनय करून रसिकांची मने जिंकली आहेत. सायली सध्या कलर्स मराठीवरील ‘शुभमंगल ऑनलाईन’ या मालिकेत सुयश टिळकसोबत काम करत आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-‘अगं किती गोड’, म्हणत ‘राधिका’च्या सौंदर्यावर भुलली ‘ही’ अभिनेत्री

-अबब! मौनी रॉयने बिकिनीमध्ये केला इंटरनेटवर कहर, बोल्ड अंदाज पाहून चाहतेही झाले हैराण

-Bigg Boss OTT: शोवर भडकली माजी स्पर्धक सोफिया हयात; म्हणाली ‘करण जोहर सलमान खानपेक्षाही वाईट…’

हे देखील वाचा