मधल्या काही काळापासून अभिनेत्री मानसी नाईक तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे कामलीची चर्चेत आली. मानसीने तिच्या नवऱ्यापासून वेगळे होण्याचा निर्णय घेतला आणि तिच्या फॅन्ससह सर्वांनाच मोठा धक्का बसला. मराठी मनोरंजन क्षेत्रातील ऐश्वर्या राय अशी ओळख असणाऱ्या मानसीसाठी देखील हा निर्णय अवघड होता मात्र आता मानसीने आयुष्यात पुढे जाणायचे ठरवले आहे. त्यातच तिने नुकतेच अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर एक घर देखील घेतले. सोशल मीडियाच्या माध्यमातून मानसीने तिचे हे घर सर्वांना दाखवले. सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर सक्रिय असणाऱ्या मानसीने एक पोस्ट शेअर केली आहे. जी सध्या चांगलीच व्हायरल झाली असून, यात तिने तिच्या नव्या आयुष्याची सुरुवात करत असल्याचे सांगितले आहे.
मानसीने तिचा एक सुंदर फोटो पोस्ट केला आहे. यात तिने गुलाबी रंगाची सिल्क साडी नेसली असून यात ती कमालीची सुंदर दिसत आहे. या फोटोला कॅप्शन देताना मानसीने लिहिले, “स्वत:च्या स्वार्थासाठी परमार्थ करत आहे. नवे रस्ते शोधण्यासाठी जुन्या वाटेने जात आहे. विश्वासाने विश्वास ठेवते कुणावर,अविश्वासाने संशय घेते, त्यावर सत्याच्या वाटेने जाण्यासाठी असत्याची कास धरावी लागते, खरं खोटं जाणण्यासाठी देवालाच हाक द्यावी लागते. माझं सारं खरं खोटं देवालाच ठाऊक आहे. म्हणूनच माझा त्याच्यावर विश्वास आहे. भावनांचा विचार केला तर माझं मन एक दगड आहे, मनाच्या या दगडाला प्रामाणिकतेचा पैलू आहे. प्रामाणिकपणे या दगडाला एक एक पैलू पडत आहे, हिरा होईल ना होईल या दगडाची किंमत वाढवत आहे.”
View this post on Instagram
पुढे तिने लिहिले, “आपल्याला पुढे जाण्याचा निर्णय घ्यावा लागतो, तो आपोआप घेतला जात नाही. तुम्हाला स्वत:ला उठून म्हणावे लागेल, हे कठीण असले तरी मला आता याची पर्वा नाही. मी निराश आहे, याची मला चिंता नाही. मी माझ्याकडून उत्तम देण्याचा प्रयत्न करत आहे. मी माझ्या आयुष्यात पुढे जात आहे”.
दरम्यान मानसीने अनेक मराठी चित्रपटांमध्ये काम केले आहे. मात्र तिचे बघतोय रिक्षावाला हे गाणे कमालीचे गाजले. आजही काही लोकं तिला याच गाण्यामुळे ओळखतात. आता लवकरच तिच्या फॅन्सला तिला नवीन प्रोजेक्टमध्ये पाहण्याची इच्छा आहे.