Monday, July 1, 2024

Fathers Day : मराठी अभिनेत्रींनी सांगितल्या त्यांच्या बाबांच्या आठवणी, दिग्गज अभिनेत्रींच्या व्हायरल पोस्ट एकदा पाहाच

 दिनांक १९ मार्च हा दिवस जगभरात पितृदिन म्हणून साजरा केला जातो. प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यात आपल्या बाबांची एक खास जागा असते. माणसाला मोठ होताना यशाकडे झेप घेताना जी व्यक्ती सदैव सोबत असते ती म्हणजे आपले वडील. त्यामुळेच प्रत्येकाच्या आभाळाएवढ्या यशात त्यांच्या वडिलांनीच खंबीर साथ दिलेली असते. त्यामुळेच फादर्स डे निमित्ताने प्रत्येकजण आपल्या वडिलांबद्दलच्या खास आठवणी शेअर करत असतो. मराठी सिने जगतातील अभिनेत्रींनीही आपल्या वडिलांच्या फोटोसह दिलेल्या ह्रदयस्पर्शी आठवणी सध्या सोशल मीडियावर चांगल्याच व्हायरल होत आहेत. पाहूया याच अभिनेत्रींच्या पोस्टची ही खास झलक.

मराठी सिने जगतात अशा अनेक अभिनेत्री आहेत ज्या त्यांच्या अभिनयाइतक्याच सोशल मीडियावरही नेहमीच चर्चेत असतात. सोशल मीडियावरुन त्या नेहमीच आपले व्हिडिओ आणि फोटो सोशल मीडिया अकाउंटवरुन शेअर करत असतात. जागतिक पितृदिनाच्या निमित्तानेही अनेक अभिनेत्रींनी आपल्या वडिलांसोबतचे बालपणीचे फोटो शेअर केले आहेत ज्याची सध्या सर्वत्र चर्चा होताना दिसत आहे.

सोनाली कुलकर्णी – अभिनेत्री सोनाली कुलकर्णी आपल्या बाबांसोबतचा एक फोटो शेअर केला आहे. ज्याखाली  दिलेल्या सुंदर कॅप्शनने सर्वांचेच लक्ष वेधले आहे. यामध्ये सोनालीने माझे बाबा, माझ्या मुलीचा बाबा, नचिकेतचे बाबा,  माझ्या आईचे बाबा,ह्या सगळ्या बाबांनी आम्हाला खूप प्रेम, आधार आणि स्थैर्य दिलंय अशा सुंदर शब्दात आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

मराठी अभिनेत्री मृण्मयी देशपांडेनेही आपल्या बाबांसोबतचा खास फोटो शेअर करत शुभेच्छा दिल्या आहेत. तर मी कायम तुमच्यासाठी लहान बनूनच राहीन अशा गोड शब्दातील अपूर्वा नेमळेकरच्या पोस्टने सर्वांचेच लक्ष वेधले आहे. ज्यामध्ये वडिलांचे बोट पकडून चालणारी बालपणीची अपूर्वा दिसत आहे.

आपल्या सहजसुंदर अभिनयाने सर्वांचेच मन जिंकणारी अभिनेत्री अमृता खानविलकरनेही आपल्या सोशल मीडिया अकाउंटवरुन पोस्ट शेअर केली आहे. तर माझ्यावर बाबांनी नेहमीच विश्वास ठेवला आणि मला माझी स्वप्न पुर्ण करण्यात मदत केली म्हणत अभिज्ञा भावेनेही आपल्या वडिलांचा फोटो शेअर केला आहे. मराठी अभिनेत्रींच्या या खास पोस्ट सध्या सोशल मीडियावर चांगल्याच व्हायरल होत आहेत.

हे देखील वाचा