Thursday, December 12, 2024
[aioseo_breadcrumbs]

‘दिसला गं बाई दिसला’, म्हणणाऱ्या ‘राजा राणीची गं जोडी’ फेम संजूचा गावरान अवतार भावला नेटकऱ्यांना

मराठी मालिका या प्रेक्षकांना प्रामुख्याने आवडतात. कारण त्यातील पात्र सर्वांना आपल्या जवळची आणि हवीहवीशी वाटतात. यातीलच कलर्स मराठीवरील लोकप्रिय मालिका म्हणजे ‘राजा राणी ची गं जोडी.’ या मालिकेत मुख्य भूमिकेत असणारी अभिनेत्री शिवानी सोनार ही चांगलीच प्रसिद्ध झाली आहे. अनेक टॉप अभिनेत्रींना मागे सारून शिवानी आता लोकप्रिय अभिनेत्री झाली आहे. या मालिकेतील तिचे डायलॉग, हावभाव, सर्व प्रकारच्या भावना ती उत्तम आणि प्रभावी पद्धतीने स्क्रीनवर दाखवते. तसेच सोशल मीडियावर देखील तिचा चांगलाच वावर असतो. तिने नुकताच सोशल मीडियावर एक फोटो शेअर केला आहे.

शिवानीने अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवरून तिचे काही फोटो शेअर केले आहेत. या फोटोमध्ये ती मराठमोळ्या लूकमध्ये दिसत आहे. तिने आकाशी रंगाची नऊवारी साडी नेसलेली असून, त्यावर चोळी घातली आहे. गळ्यात छोटे मंगळसूत्र, हातात हिरव्या बांगड्या, केसांचा अंबाडा असा टिपिकल महाराष्ट्रातील गावाकडच्या स्त्रियांसारखा तिने केलेला लूक चांगलाच भाव खाऊन जात आहे. तसेच कमरेवर एक टोपली घेतली आहे. या लूकमध्ये ती शेतकरीण दिसत आहे. खरंतर तिचा हा लूक ‘राजा राणी ची गं जोडी’ या मालिकेतील आहे. (Marathi actress shivani sonar share her photo on social media)

हा फोटो शेअर करून तिने लिहिले आहे की, “दिसला गं बाई दिसला.” तिच्या या फोटोवर अनेकजण कमेंट करत आहेत. या फोटोवर अभिनेत्री अपूर्वा गोरे हिने “अगं किती सुंदर” अशी कमेंट केली आहे. तर आणखी एका चाहत्याने या फोटोवर कमेंट केली आहे की, “तुला बघुन गालात हसला.” तसेच बाकी अनेक चाहते या फोटोवर प्रतिक्रिया देत आहेत.

शिवानी ही घराघरात पोहचली आहे. ‘राजा राणीची गं जोडी’ या मालिकेतील तिचा अभिनय प्रेक्षकांना खूपच आवडत आहे. मालिकेतील तिचे संजीवनी नावाचे पात्र देखील चांगलेच गाजत आहे. याआधी तिने ‘गर्लफ्रेंड’ या चित्रपटात भूमिका निभावली होती तसेच तिने ‘पांडू’ आणि ‘अगली डेस्क’ या चित्रपटात देखील काम केले आहे. पण यातून तिला काही फारसी ओळख मिळाली नव्हती. या मालिकेने तिची लोकप्रियता शिखराला पोहचवली आहे.

 

दैनिक बोंबाबोंचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-‘कू’ ऍपवरही कंगना रणौत गाजवतेय वर्चस्व; काही दिवसांतच मिळवले तब्बल ‘इतके’ फॉलोव्हर्स

-‘हा निव्वळ पब्लिसिटी स्टंट’, म्हणत मनोज पाटील आत्महत्या प्रकरणावर साहिल खानने सोडले मौन

-शूटिंग सोडून तुर्कीमध्ये ‘हे’ काम करताना दिसली बॉलिवूडची ‘बार्बी गर्ल’, व्हिडिओ शेअर करत म्हणतेय…

हे देखील वाचा