Tuesday, July 9, 2024

काय सांगता! ‘या’ दोन मराठमोळ्या अभिनेत्री आहेत बहिणी, फोटो शेअर करून एकीने दिली माहिती

कलाकारांच्या व्यावसायिक आयुष्यात मेकअप, ड्रेस, अभिनय, कॅमेरा या सगळ्या गोष्टी तर महत्वाच्या असतात, पण यातील आणखी एक महत्वाची गोष्ट म्हणजे फोटोशूट. कलाकार नेहमीच त्यांचे फोटो सोशल मीडियावर शेअर करत असतात. नेहमीच आपले वेगवेगळे फोटोशूट करून सोशल मीडियावर शेअर करत असतात. सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात सक्रिय असणाऱ्या अभिनेत्रींमध्ये श्रुती मराठे हिचा समावेश होतो. ती नेहमीच तिचे फोटो शेअर करत असते. अशातच तिने तिचा एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे.

श्रुतीने अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवरून तिचा एक फोटो शेअर केला आहे. ज्या फोटोमध्ये ती फार सुंदर दिसत आहे. या फोटोमध्ये ती बोल्ड पोझ देताना दिसत आहे. तिने काळ्या रंगाचा टॉप परिधान केला आहे. तिने हातात गॉगल घेतलेला आहे. तसेच मिडल पार्टेशन करून केस मोकळे सोडले आहे. एकंदरीत ती फार सुंदर दिसत आहेत. (Marathi actress Shruti Marathe share her photo on social media)

श्रुतीच्या या फोटोसोबत तिचे कॅप्शन देखील लक्षवेधी ठरत आहे. हा फोटो शेअर करून तिने “प्रार्थना बेहेरेची बहीण,” असे कॅप्शन दिले आहे. याचे कारण म्हणजे प्रार्थनाने देखील सेम या लूकमधील फोटो शेअर केला होता. तिचे चाहते देखील या फोटोवर कमेंट करून “तुम्ही दोघी सारख्या दिसता,” अशी कमेंट करत आहेत. तसेच त्या दोघी एकत्र चित्रपटात कधी दिसणार आहेत का, असे विचारत आहेत.

श्रृती मराठेच्या कामाबद्दल बोलायचे झाल्यास, तिने अनेक चित्रपटात काम केले आहे. तिने ‘तप्तपदी’, ‘प्रेमसूत्र’, ‘बंध नायलॉनचे’, ‘अरावण’, ‘शुभमंगल सावधान’, ‘इंदिरा विझा’ या चित्रपटात काम केले आहे. तसेच तिने ‘राधा ही बावरी’ या मालिकेत काम केले आहे.

दैनिक बोंबाबोंचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-‘सोनालीची झलक सबसे अलग!’ अभिनेत्रीच्या साडीलूकने चाहत्यांना केलं डायरेक्ट ‘क्लीन बोल्ड’

-‘लंबी है जिंदगी, मिलेंगे फिरसे…’, म्हणत सिद्धार्थ शुक्लाने घेतला सर्वांचा निरोप; व्हायरल होतोय व्हिडिओ

मूर्ती लहान पण कीर्ती महान! सोपी नव्हती वाट, वाचा के.के. गोस्वामी यांनी यशाचा शिखर गाठण्यासाठी केलेला संघर्ष

हे देखील वाचा