टेलिव्हिजनवरील ‘राधा ही बावरी’ फेम अभिनेत्री म्हणजे श्रुती मराठे होय. श्रुतीने अनेक चित्रपटात आणि मालिकांमध्ये काम करून तिचे नाव घराघरात पोहोचवले आहे. ‘राधा ही बावरी’ या मालिकेतील तिचे सरळ साधे आणि सालस पात्र सर्वांच्याच मनात घर करून गेले, पण पडद्यावर सालस दिसणारी श्रुती तिच्या वैयक्तिक आयुष्यात मात्र खूपच ग्लॅमरस आहे. अनेकवेळा ती ग्लॅमरस तसेच पारंपारिक पोशाखातील फोटो शेअर करत असते. अशातच तिचे साडीमधील काही फोटो समोर आले आहेत.
श्रुतीने अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवरून तिचे काही साडीमधील फोटो शेअर केले आहेत. या फोटोमध्ये आपण पाहू शकतो की, तिने गुलाबी रंगाची सुंदर साडी नेसली आहे. यासोबत तिने गडद गुलाबी रंगाचा सुंदर ब्लाऊज घातला आहे. यावर तिने गळ्यात सोनेरी रंगाचा नेकलेस घातला आहे. तसेच कानात सोनेरी ईअरिंग घातले आहेत. तसेच तिने साडीला मॅचिंग अशा बांगड्या घातल्या आहेत. या सगळ्या लूकमध्ये ती फारच सुंदर दिसत आहे. परंतु तिच्या चेहऱ्यावर असणाऱ्या गोड स्माईलने तिच्या सौंदर्यात आणखीनच भर पाडली आहे. (Marathi actress Shruti Marathe share her photo on social media)
तिचे चाहते या फोटोवर लाईक्स आणि कमेंट्सचा पाऊस पाडताना दिसत आहेत. एका चाहत्याने या फोटोवर “सावर रे मना,” अशी कमेंट केली आहे. आणखी एका चाहत्याने लिहिले आहे की, “काय झाले हसायला अरे खरचं सांगतो, साडीपेक्षा तू सुंदर आहेस.” दुसऱ्या एका चाहत्याने “कोजागिरी पौर्णिमेचा चंद्र,” अशी कमेंट केली आहे. तिचे हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
श्रुती मराठेच्या कामाबद्दल बोलायचे झाल्यास, तिने अनेक चित्रपटात काम केले आहे. तिने ‘तप्तपदी’, ‘प्रेमसूत्र’, ‘बंध नायलॉनचे’, ‘अरावण’, ‘शुभमंगल सावधान’, ‘इंदिरा विझा’ ‘सनई चौघडे’, ‘असा मी तसा मी’, ‘रमा माधव’, ‘तुझी माझी लव्ह स्टोरी’, ‘मुंबई पुणे मुंबई २’, ‘स्लॅमबुक’, ‘जागो मोहन प्यारे’, या चित्रपटात आणि मलिकांमध्ये काम केले आहे.
दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-
-‘अशक्य सुंदर’, अमृता खानविलकरचा फोटो पाहून चाहते तर सोडाच, कलाकारांनीही पाडला कमेंट्सचा पाऊस
-‘कुछ कुछ होता है अभ्या…’, म्हणत ‘सुंदरा मनामध्ये भरली’ फेम अक्षयाने मजेशीर फोटो केले शेअर
-‘तू तुझा प्रोग्राम सुरू कर, मीच बॉस म्हणून’, वीकेंडला मांजरेकरांकडून मीरा अन् गायत्रीची खरडपट्टी