कलाकारांच्या व्यावसायिक आयुष्यात मेकअप, ड्रेस, अभिनय, कॅमेरा या सगळ्या गोष्टी तर महत्वाच्या असतात. पण यातील आणखी एक महत्वाची गोष्ट म्हणजे फोटोशूट. कलाकार नेहमीच त्यांचे फोटो सोशल मीडियावर शेअर करत असतात. नेहमीच आपले वेगवेगळे फोटोशूट करून सोशल मीडियावर शेअर करत असतात. सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात सक्रिय असणाऱ्या अभिनेत्रींमध्ये श्रुती मराठे हिचा समावेश होतो. ती नेहमीच तिचे फोटो शेअर करत असते. अशातच तिने तिचा एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे.
श्रुतीने अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवरून तिचे काही फोटो शेअर केले आहेत. या फोटोमध्ये तिने जांभळ्या रंगाची साडी घातली आहे. यावर तिने सोनेरी रंगाचा ब्लाऊज घातला आहे. या फोटोमध्ये तिने केवळ कानात मोठे ईअरिंग आणि हातात बांगड्या घातल्या आहेत. कपाळाला छोटीशी टिकली लावली आहे. तसेच सगळे केस मोकळे सोडले आहेत. या फोटोमध्ये ती खूप सुंदर दिसत आहे. एकंदरीत या मराठमोळया लूकमध्ये ती शोभून दिसत आहे. (Marathi actress Shruti Marathe share her photos on social media)
श्रुतीने शेअर केलेला हा फोटो तिच्या चाहत्यांना खूप आवडला आहे. तिचे हे मनमोहक सौंदर्य पाहून तिचे चाहते अक्षरशः शायर झाले आहेत. तिच्या एका चाहत्याने या फोटोवर कमेंट केली आहे की, “बाल भी खुले थे, उसने काजल भी लगा रखा था, उसके झुमके ने तो अलग ही उधम मचा रखा था.” आणखी एका चाहत्याने लिहिले आहे की, “आज खूप दिवसांनंतर चंद्र पाहिला.” तिचा हा फोटो जोरदार व्हायरल होत आहे.
श्रती मराठेच्या कामाबद्दल बोलायचे झाल्यास, तिने अनेक चित्रपटात काम केले आहे. तिने ‘तप्तपदी’, ‘प्रेमसूत्र’, ‘बंध नायलॉनचे’, ‘अरावण’, ‘शुभमंगल सावधान’, ‘इंदिरा विझा’ या चित्रपटात काम केले आहे. तसेच तिने ‘राधा ही बावरी’ या मालिकेत काम केले आहे.
दैनिक बोंबाबोंचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-
-मलायका अरोराला आवडतो ‘अशा’प्रकारचा व्यक्ती, मिलिंद सोमणपुढे केला खुलासा
-निधन झाले गायिकेचे, पण सपना चौधरीलाच ठरवले मृत; अफवेने उडाली होती कुटुंबीयांची झोप
-ज्येष्ठ अभिनेते दिलीप कुमार यांचे ट्विटर अकाऊंट कायमचे बंद, ‘ही’ आहे शेवटची पोस्ट