टेलिव्हिजनवरील ‘राधा ही बावरी’ फेम अभिनेत्री म्हणजे श्रुती मराठे होय. श्रुती मराठेने अनेक चित्रपटात आणि मालिकांमध्ये काम करून तिचे नाव घराघरात पोहचवले आहे. ‘राधा ही बावरी’ या मालिकेतील तिचे सरळ साधे आणि सालस पात्र सर्वांच्याच मनात घर करून गेले. पण पडद्यावर सालस दिसणारी श्रुती तिच्या वैयक्तिक आयुष्यात मात्र खूपच ग्लॅमरस आहे. अनेकवेळा ती ग्लॅमरस तसेच पारंपारिक पोशाखातील फोटो शेअर करत असते. अशातच तिने तिचे काही सुंदर फोटो शेअर केले आहेत.
श्रुतीने अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवरून तिचे सुंदर असे फोटो शेअर केले आहेत. या फोटोमध्ये आपण पाहू शकतो की, तिने गुलाबी रंगाचा सुंदर असा लाँग ड्रेस घातला असून, तसेच केसांना सेमी कर्ल करून एक वेगळा लूक दिला आहे. तसेच कानात सुंदर असे डायमंडचे ईअरिंग घातले आहेत. तिने या ड्रेसला साजेसा असा मेकअप केलेला दिसत आहे. या लूकमध्ये ती खूपच सुंदर दिसत आहे. (Marathi actress Shruti Marathe’s Barbie look viral on social media)
तिचा हा बार्बी लूक तिच्या चाहत्यांना देखील खूप आवडला आहे. अनेकजण या फोटोवर कमेंट करून तिच्या या लूकचे कौतुक करत आहेत. तिच्या एका चाहत्याने या फोटोवर “रूप की राणी” अशी कमेंट केली आहे. तसेच बाकी अनेक चाहते या फोटोवर हार्ट ईमोजी पोस्ट करत आहेत.
श्रुती मराठेच्या कामाबद्दल बोलायचे झाल्यास, तिने अनेक चित्रपटात काम केले आहे. तिने ‘तप्तपदी’, ‘प्रेमसूत्र’, ‘बंध नायलॉनचे’, ‘अरावण’, ‘शुभमंगल सावधान’, ‘इंदिरा विझा’ ‘सनई चौघडे’, ‘असा मी तसा मी’, ‘रमा माधव’, ‘तुझी माझी लव्ह स्टोरी’, ‘मुंबई पुणे मुंबई २’, ‘स्लॅमबुक’, ‘जागो मोहन प्यारे’ या चित्रपटात आणि मलिकांमध्ये काम केले आहे.
दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-
–तब्बूला पाहून जेव्हा ‘या’ अभिनेत्याचा सुटला स्वतःवरचा ताबा, आजही तिच्या आठवणीत आहे ‘तो’ किस्सा
–तर ‘अशा’ पद्धतीने घातली विकी कौशलने कॅटरिना कैफला लग्नाची मागणी
–लग्नानंतर साजऱ्या होणाऱ्या पहिल्या दिवाळीसाठी सोनाली कुलकर्णीने केली खास तयारी शेअर केला व्हिडिओ