Thursday, December 12, 2024
[aioseo_breadcrumbs]

‘किती सुंदर दिसावं एका माणसाने’, श्रुती मराठेच्या दिलखेचक फोटोवर चाहत्याची झक्कास कमेंट

मराठी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री श्रुती मराठे ही आजकाल सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात सक्रिय असते. तिचे नवनवीन फोटो ती सध्या सातत्याने शेअर करत असते. मागील काही दिवसात तिच्या बोल्ड फोटोंनी सोशल मीडियावर नुसता धुमाकूळ घातला होता. तिचे चाहते देखील तिच्या या पोस्टला जोरदार प्रतिसाद देत असतात. अशातच तिने पुन्हा एकदा सोशल मीडियावर तिचे घायाळ करणारे फोटो शेअर केले आहेत. तिचे हे नवीन फोटो चांगलेच चर्चेत आले आहेत.

श्रुतीने तिच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवरून तिचे साडीमधील काही फोटो शेअर केले आहेत. या फोटोमध्ये ती कमालीची सुंदर दिसत आहे. श्रुतीने शेअर केलेल्या या फोटोमध्ये तुम्ही पाहू शकता की, तिने चॉकलेटी रंगाची साडी नेसलेली आहे. तसेच तिने चंदेरी रंगाचा स्लिव्हलेस ब्लाउज घातला आहे. यावर तिने सोनेरी रंगाची ज्वेलरी घातली आहे. तसेच तिने हातात बांगड्या, अंगठी घातली आहे. केसांचा अंबाडा घालून केसात मोगऱ्याच्या फुलांचा गजरा माळला आहे. तसेच कपाळी टिकली आणि नोजपिन घातलेली आहे. या सगळ्या साजशृंगारात तिचे रूप आणखीनच खुलले आहे. या साडीमध्ये ती अनेक पोझ देताना दिसत आहे. (marathi actress shruti marathe’s saree photos viral on social media )

तिचे चाहते तिच्या या फोटोवर सातत्याने कमेंट करत आहे. अनेकजण तिच्या या फोटोवर फायर ईमोजी तसेच हार्ट ईमोजी पोस्ट करत आहेत. कोणी तिला ‘परम सुंदरी’ म्हणत आहे, तर कोणी तिला ‘लावण्यवती’ म्हणत आहे. तसेच तिच्या एका चाहत्याने या फोटोवर कमेंट केली आहे की, “किती सुंदर दिसावं एका माणसाने.” तिचा हा फोटो सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. या फोटोला आतापर्यंत ५५ हजारापेक्षाही जास्त लाईक्स मिळाले आहेत.

श्रुतीने झी मराठीवरील ‘राधा ही बावरी’ या मालिकेत काम केले आहे. या मालिकेतील तिची भूमिका प्रेक्षकांना खूप आवडली होती. या मालिकेमधून श्रुती महाराष्ट्रातील घराघरात पोहचली होती. त्यानंतर तिने अनेक चित्रपटात काम केले आहे. तिने ‘तप्तपदी’, ‘प्रेमसूत्र’, ‘बंध नायलॉनचे’, ‘अरावण’, ‘शुभमंगल सावधान’, ‘इंदिरा विझा’ या चित्रपटात काम केले आहे. यासोबत श्रुती एक उत्तम डान्सर देखील आहे. तिने अनेक गाण्यांवर डान्स केला आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-आलिया भट्टला किस करताना दिसला रणबीर कपूर, ‘त्या’ फोटोमध्ये पाहायला मिळाली दोघांची रोमॅंटिक केमिस्ट्री

-‘सुपर डान्सर ४’च्या मंचावर शिल्पा शेट्टीचे दणक्यात स्वागत; सगळ्यांचे प्रेम पाहून अभिनेत्रीला अश्रू झाले अनावर

-Bigg Boss OTT : शमिता शेट्टी अन् राकेश बापट यांच्यामध्ये वादावादी, अभिनेत्रीने दिला डायपर घालण्याचा सल्ला

हे देखील वाचा