टेलिव्हिजनवरील ‘राधा ही बावरी’मध्ये काम करून प्रसिद्ध झालेली अभिनेत्री म्हणजे श्रुती मराठे होय. श्रुती मराठेने अनेक चित्रपटात आणि मालिकांमध्ये काम करून तिचे नाव घराघरात पोहोचवले आहे. तिच्या ‘राधा ही बावरी’ या मालिकेतील तिचे सरळ साधे आणि सालस पात्र सर्वांच्याच मनात घर करून गेले, पण पडद्यावर सालस दिसणारी श्रुती तिच्या वैयक्तिक आयुष्यात मात्र खूपच ग्लॅमरस आहे. श्रृतीचे काही ग्लॅमरस फोटो या दिवसात वेगाने व्हायरल होताना दिसत आहे.
श्रुतीने तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून तिचे काही फोटो शेअर केले आहेत. या फोटोमध्ये तिने लाल रंगाचा शॉर्ट ड्रेस घातला आहे. तिने केसांची पोनीटेल घातली आहे. तसेच कानात मोठ्या रिंगा घातल्या आहेत. तसेच फोटोमधील तिची स्माईल सगळ्यांना खूप आवडत आहे. ( Marathi actress Shruti Marathi’s glamorous photo viral on social media)
तिच्या या फोटोवर लाईक्स आणि कमेंट्सचा अक्षरशः वर्षाव होताना दिसत आहे. एका चाहत्याने या फोटोवर कमेंट केली आहे की, “तुम्ही इतक्या सुंदर का आहात, तुम्हाला बघून माझा जीवच गेला.” आणखी एका चाहत्याने कमेंट केली आहे की, “सुहास्य वदनी सुंदरा,” तसेच बाकी चाहते देखील या फोटोवर त्यांच्या प्रतिक्रिया देत आहेत. या फोटोला आतापर्यंत ४६ हजारांपेक्षाही जास्त लाईक्स मिळाले आहेत.
श्रृती मराठेच्या कामाबद्दल बोलायचे झाल्यास, तिने अनेक चित्रपटात काम केले आहे. तिने ‘तप्तपदी’, ‘प्रेमसूत्र’, ‘बंध नायलॉनचे’, ‘अरावण’, ‘शुभमंगल सावधान’, ‘इंदिरा विझा’ ‘सनई चौघडे’, ‘असा मी तसा मी’, ‘रमा माधव’, ‘तुझी माझी लव्ह स्टोरी’, ‘मुंबई पुणे मुंबई २’, ‘स्लॅमबुक’, ‘जागो मोहन प्यारे’, या चित्रपटात आणि मलिकांमध्ये काम केले आहे.
दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-
-‘मिठीत जाऊन तुझ्या मिटावे…’, स्पृहा जोशीच्या फोटोसोबत कॅप्शननेही वेधले चाहत्यांचे लक्ष
-बोल्ड ऍंड ब्यूटीफुल! सई ताम्हणकरच्या हॉटनेसने नेटकरी झाले पुरते वेडे; फोटोवर पडतोय लाईक्सचा पाऊस