Saturday, June 29, 2024

‘स्पष्ट वय दिसतेय!’ म्हणून ट्रोल करणाऱ्याला सोनालीचा जोरदार पंच, म्हणाली…

मराठी चित्रपटसृष्टीतील अप्सरा म्हणजेच सर्वांची लाडकी अभिनेत्री सोनाली कुलकर्णी ही आजकाल सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात सक्रिय असते. तिच्या वैयक्तिक तसेच व्यावसायिक आयुष्यातील अनेक घटनांची माहिती ती सोशल मीडियावर तिच्या चाहत्यांना देत असते. मागील काही दिवसात सोनाली तिचा पती कुणालसोबत मालदीवला गेली होती. तेथील अनेक फोटो तिने सोशल मीडियावर शेअर केले आहेत. तिने बिकिनी घालून समुद्रकिनारी देखील फोटोशूट केले होते. तिचे हे फोटो तिच्या चाहत्यांना देखील मोठ्या प्रमाणात आवडले होते.

सोनालीने नुकतेच काही दिवसांपूर्वी तिच्या अधिकृत फेसबुक पेजवरून तिचे मालदीवमधील काही फोटो शेअर केले आहेत. या फोटोमध्ये तिने रंगीबेरंगी बिकिनी घातली होती. फोटोमध्ये ती समुद्रकिनारी एन्जॉय करताना दिसत आहे. अनेकांना तिचे हे फोटो खूप आवडले आहेत. (marathi actress sonalee kulkarni give answer to person’s comment on social media)

https://www.facebook.com/sonalee1/posts/415114173305249

या फोटोवर खूप कमेंट आल्या आहेत, पण यातील एका व्यक्तीची कमेंट मात्र, चांगलीच चर्चेचा विषय बनली आहे. सोनालीच्या या फोटोवर एका व्यक्तीने “स्पष्ट वय दिसतंय,” अशी कमेंट केली आहे. यावर सोनालीने देखील त्याला सडेतोड उत्तर दिले आहे. त्या व्यक्तीच्या कमेंटला तिने “मग, मी कुठे लपवतेय,” असा रिप्लाय दिला आहे.

Photo Courtesy: Twiter/sonalee1

त्या व्यक्तीने सोनालीच्या फोटोला अशी कमेंट केल्यामुळे तिच्या चाहत्यावर्गात देखील काहीशा प्रमाणात संताप झालेला दिसत आहे. तिचे चाहते सोनालीने अशा शब्दात उत्तर दिलं याबद्दल तिचे कौतुक करत आहेत. सोबत “हे सोनालीचे फॅनपेज आहे. नको असेल तर यातून बाहेर पडा,” अशा शब्दात त्या व्यक्तीला सुनावत आहेत. तिचा सोशल मीडियावर मोठ्या संख्येने चाहतावर्ग आहे. तिच्या प्रत्येक फोटोला तिचे चाहते भरभरून प्रेम देत असतात.

सोनालीच्या कामाबद्दल बोलायचे झाल्यास, सोनाली एक उत्कृष्ट अभिनेत्री आणि डान्सर देखील आहे. तिने अनेक चित्रपटात काम केले आहे. तिने तिच्या करिअरमध्ये ‘मितवा’, ‘नटरंग’, ‘हिरकणी’, ‘ग्रँड मस्ती’, ‘पोस्टर गर्ल’, ‘क्लासमेट’, ‘धुराळा’, ‘हंपी’, ‘शटर’, ‘अजिंठा’, ‘ती आणि ती’, ‘क्षणभर विश्रांती’, ‘मस्ती’, सिंघम रिटर्न्स’ यांसारख्या अनेक मराठी आणि हिंदी चित्रपटात काम केले आहे. यासोबतच ती लवकरच ‘तमाशा लाईव्ह’ या चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटाचा पोस्टर तिने काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर शेअर केला होता.

दैनिक बोंबाबोंचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-कोव्हिडमधून बरे झाल्यानंतर ‘अशी’ झाली होती रुबीनाची हालत; म्हणाली, ‘मी पुन्हा ५० किलो वजन…’

-नेहा कक्कर आहे गरोदर? ‘बिग बॉस ओटीटी’मध्ये देणार गोड बातमी

-‘लक्ष वेधण्यासाठी कपडे काढणे, हा माझा अजेंडा नाही’, म्हणत निया शर्माने ट्रोलिंगवर सोडले मौन

हे देखील वाचा