Friday, July 5, 2024

‘मदत केलीये ती बोंबलून सांगणं मला तरी पटत नाही’, कोरोना काळात मदत कर म्हणणाऱ्या युजरला सोनालीने शिकवला धडा

सध्या देशात कोरोना व्हायरसने हाहाकार माजवला आहे. सगळीकडेच औषधे, बेड्स आणि इतर आवश्यक वैद्यकीय गोष्टींचा तुटवडा निर्माण झाला आहे. आरोग्य यंत्रणेवर पुरता ताण आला आहे. यामध्ये आपणही समाजाचं काहीतरी देणं लागतो म्हणून कलाकार मंडळीही कोरोनाविरुद्धच्या लढाईत उतरले आहेत. प्रत्येक कलाकार आपल्या परीने होईल ती मदत करताना दिसत आहे. काही कलाकार असे आहेत, जे कोणालाही कळू न देता गरजू लोकांपर्यंत मदत पोहोचवत आहेत. परंतु अशा कलाकारांना नेहमीच ट्रोलिंगचा सामना करावा लागतो. असेच काहीसे मराठमोळी अभिनेत्री सोनाली कुलकर्णीबरोबर झाले. मात्र, ट्रोल करणाऱ्या युजरला सोनालीने आपल्या अंदाजात चांगलाच धडा शिकवला आहे.

सोनाली ७ मे रोजी दुबई येथे कुणाल बेनोडेकरसोबत लग्नबंधनात अडकली. याची माहिती तिने नुकतीच एक पोस्ट शेअर करत दिली. यानंतर तिच्यावर शुभेच्छांचा वर्षाव झाला. तिला एका ट्विटर युजरने ट्वीट करत शुभेच्छा दिल्या. मात्र, यावर दुसऱ्या एका युजरने कमेंट करत लिहिले की, “परदेशात मजा करत आहेत, मदत करा म्हणावं कोव्हिडसाठी.”

https://twitter.com/pradyumnaspeak/status/1394937691137925124

यानंतर नेहमीच सोशल मीडियावर सक्रिय असणारी ‘अप्सरा’ सोनालीही कडाडली आणि तिने त्या युजरला खणखणीत प्रत्युत्तर दिले. ती म्हणाली की, “Really??? तुम्ही, आम्ही केलेली मदत पाहिली नाही, म्हणून आम्ही काही केलंच नाही, किंवा करतंच नाही, असं होत नाही. मी काय मदत केलीये ती बोंबलून सांगणं मला तरी योग्य वाटत नाही. असो, सगळ्यांना एकाच पठडीत बसवणं चूकीचं आहे.” यानंतर मात्र युजरने आपली चूक मान्य केली.

अशीच एक कमेंट दुसऱ्या एका युजरने केली होती. तो म्हणाला होता की, “आता मुलं झाल्यावर येणार असेल, नाही तर नागरिकता कशी मिळेल त्याला.”

यावर प्रत्युत्तर देत सोनाली म्हणाली की, “मित्रा UAE हा देश परदेशी लोकांना नागरिकता प्रदान करत नाही. So please, just because you can, म्हणून उठ-सुट बोलायचं नाही. जरा अभ्यास करा.”

पुढे त्या युजरने म्हटले की, “मला वाटलं अमेरिकेत लग्न केलं असेल आणि लग्न दुबईत केलं म्हणजे मुलं तेथे होईल अशी शक्यता पण नाही.”

यानंतर मात्र अभिनेत्री चांगलीच भडकली आणि म्हणाली की, “तुम्हाला काहीही वाटू शकतं आणि तुम्ही आम्हाला काहीही बोलू शकता… हे आता खपवून घेणार नाही. किमान मी तरी नाही. समाजभान ठेऊन वागणे, समाजाला देणे लागणे, देऊ करणे, जबाबदार नागरिक म्हणून वावरणे, माणुसकी जपणे… हे सगळं आम्ही करायचं आणि तुम्ही फक्त बसून अश्या फुकट कमेंट्स टाकायच्या.

सोनालीच्या कारकिर्दीबद्दल बोलायचे झाले, तर सुरुवातीला तिने एक मॉडेल म्हणून काम केले. त्यांनतर केदार शिंदे यांच्या ‘बकुळा नामदेव घोटाळे’ या चित्रपटातून चित्रसृष्टीमध्ये पदार्पण केले. या चित्रपटासाठी तिला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा झी गौरव पुरस्कार देखील देण्यात आला. सोनाली ही मूळची पुण्याची आहे. ती ‘नटरंग’ चित्रपटामधील ‘अप्सरा आली’ या लावणीनृत्यासाठी विशेष ओळखली जाते.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-‘अब हम ७ में!’ १ तासाची शॉपिंग अन् अवघ्या १५ मिनिटांत लग्न; ‘अप्सरा’ सोनाली कुलकर्णी चढली बोहल्यावर

-कोरोना जाईना! ‘अप्सरा’ सोनाली कुलकर्णीला आठवतायत महामारीच्या पूर्वीचे दिवस, फोटो शेअर करत म्हणाली…

-‘एक लाजरानं साजरा मुखडा!’ ‘अप्सरा’ सोनाली कुलकर्णीच्या साडीतील अदा पाहून प्रत्येकजण झाला फिदा!

हे देखील वाचा