आपल्या सर्वांच्या लाडक्या बाप्पाचे आगमन अवघ्या काही तासात होणार आहे. सगळीकडे आनंदी आनंद आणि गणरायाच्या आगमनाची जल्लोषात तयारी चालू आहे. गणेश उत्सवात सर्वात महत्वाची असते ती श्रींची मूर्ती. आपण पाहिले तर गणेशाच्या सर्वच मूर्ती आधी प्लॅस्टर ऑफ पॅरिसच्या असायच्या, मात्र लोकांमध्ये पर्यावरणासंबंधी जनजागृती वाढायला लागली आणि शाडू किंवा मातीच्या मूर्ती लोकं घेऊ लागले. याबाबतीत कलाकार देखील मागे नाही. जवळपास सर्वच कलाकार पर्यावरणपूरक शाडूच्या मातीचे गणपती तयार करून त्याची आराधना करतात. अशातच मराठी चित्रपटसृष्टीतील अप्सरा म्हणजे सोनाली कुलकर्णी ही पर्यावरणपूरक गणपती तयार करत आहे. याची झलक तिने सोशल मीडियावर दाखवली आहे.
सोनालीने अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवरून गणपती बनवण्याचा एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये तिच्यासोबत तिचा भाऊ अतुल कुलकर्णी दिसत आहे. या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, तिचा भाऊ अतुल शाडूच्या मातीचा गणपती तयार करताना दिसत आहे. तर सोनाली या गणपतीला रंग देताना दिसत आहे. (Marathi actress sonalee Kulkarni share a video of making ganpati bappa on social media)
हा व्हिडिओ शेअर करून तिने लिहिले आहे की, “वर्षातील सर्वात चांगला काळ. २ वर्षापूर्वी सुरू केलेला हा प्रयत्न यंदाही असाच पुढे नेत आहोत. माझा भाऊ अतुल कुलकर्णी शाडूच्या मातीची मूर्ती बनवतो आणि मी हळदी कुंकवाच्या पाण्याने रंगवते. तयारी बाप्पाच्या आगमनाची.”
सोनालीने शेअर केलेल्या या व्हिडिओवर तिचे अनेक चाहते प्रतिक्रिया देत आहेत. तसेच तिच्या या कलाकृतीचे कौतुक करत आहेत. सोनाली सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात सक्रिय असते. त्यामुळे तिची तगडी फॅन फॉलोविंग आहे. तिचे फोटो आणि व्हिडिओ ती सातत्याने सोशल मीडियावर शेअर करत असते. तिचे चाहते देखील तिच्या या पोस्टला भरभरून प्रतिसाद देत असतात. सोनाली लवकरच तिच्या ‘तमाशा लाईव्ह’ या चित्रपटात झळकणार आहे. काही दिवसांपूर्वी तिने या चित्रपटाचा पोस्टर तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवरून शेअर केला होता.
दैनिक बोंबाबोंचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-
-‘स्पष्ट वय दिसतेय!’ म्हणून ट्रोल करणाऱ्याला सोनालीचा जोरदार पंच, म्हणाली…
-कोव्हिडमधून बरे झाल्यानंतर ‘अशी’ झाली होती रुबीनाची हालत; म्हणाली, ‘मी पुन्हा ५० किलो वजन…’
-नेहा कक्कर आहे गरोदर? ‘बिग बॉस ओटीटी’मध्ये देणार गोड बातमी