‘अप्सरा आली म्हणत’ जिने आख्या महाराष्ट्राला वेड लावलं, आपल्या सौंदर्याने जिने सगळ्यांना भुरळ घातली, नजरेच्या एका इशाऱ्याने जिने समोरच्याला पुरते खल्लास केले, ती मराठमोळी अभिनेत्री म्हणजे सोनाली कुलकर्णी होय. सोनाली ही मराठी चित्रपटसृष्टीतील एक प्रसिद्ध अभिनेत्री आहे. तिच्या अभिनयाने ती नेहमीच सर्वांना तिच्याकडे आकर्षित करत असते. ती सोशल मीडियावर देखील मोठ्या प्रमाणात सक्रिय असते. तिचे वेगवेगळे फोटो ती नेहमीच तिच्या चाहत्यांसाठी शेअर करत असते. अशातच तिचा एक व्हिडिओ समोर आला आहे.
सोनालीने अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवरून तिचा एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, ती नाशिक ढोलवर बिनधास्त डान्स करताना दिसत आहे. या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, सोनालीने जांभळ्या रंगाची एक सुंदर पैठणी घातली आहे. यावर तिने गुलाबी रंगाचा ब्लाऊज घातला आहे. तसेच गळ्यात सोनेरी ज्वेलरी घालून संपूर्ण केस मोकळे सोडले आहे. या व्हिडिओमध्ये ती खूप सुंदर आणि दिलखुलास डान्स करताना दिसत आहे. (Marathi actress sonalee Kulkarni share her dance video on social media)
तिचा हा व्हिडिओ चांगलाच व्हायरल होताना दिसत आहे. सोनालीने शेअर केलेला हा व्हिडिओ तिच्या चाहत्यांना खूप आवडतं आहे. अनेकजण या व्हिडिओवर त्यांच्या प्रतिक्रिया देत आहेत. तिच्या एका चाहत्याने या व्हिडिओवर कमेंट केली आहे की, “सोनाली मॅम जोमात, फॅन कोमात.” तसेच बाकी अनेक चाहते हार्ट आणि फायर इमोजी पोस्ट करून तिच्या या व्हिडिओवर कौतुकाचा वर्षाव करत आहेत.
सोनालीच्या कामाबद्दल बोलायचे झाल्यास, तिने अनेक चित्रपटात काम केले आहे. तिने तिच्या करिअरमध्ये ‘मितवा’, ‘नटरंग’, ‘हिरकणी’, ‘ग्रँड मस्ती’, ‘पोस्टर गर्ल’, ‘क्लासमेट’, ‘धुरळा’, ‘हंपी’, ‘शटर’, ‘अजिंठा’, ‘ती आणि ती’, ‘क्षणभर विश्रांती’, ‘मस्ती’, सिंघम रिटर्न्स’ यांसारख्या अनेक मराठी आणि हिंदी चित्रपटात काम केले आहे. यासोबतच ती लवकरच ‘तमाशा लाईव्ह’ या चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटाचा पोस्टर तिने काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर शेअर केला होता.
दैनिक बोंबाबोंचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-
-मलायका अरोराला आवडतो ‘अशा’प्रकारचा व्यक्ती, मिलिंद सोमणपुढे केला खुलासा
-निधन झाले गायिकेचे, पण सपना चौधरीलाच ठरवले मृत; अफवेने उडाली होती कुटुंबीयांची झोप
-ज्येष्ठ अभिनेते दिलीप कुमार यांचे ट्विटर अकाऊंट कायमचे बंद, ‘ही’ आहे शेवटची पोस्ट