मराठी चित्रपटसृष्टीत काही अभिनेत्री अशा आहेत ज्यांनी त्यांच्या अभिनयाच्या जोरावर अख्खा महाराष्ट्राला आपलसं केलं आहे. अभिनय, डान्स, मॉडेलिंग अशा अनेक गोष्टीत पारंगत असलेली मराठमोळी अभिनेत्री आपल्या सर्वांची लाडकी अप्सरा म्हणजेच सोनाली कुलकर्णी होय. सोनाली ही एक लोकप्रिय आणि प्रसिद्ध अभिनेत्री आहे. तिच्या रूपाने मराठी चित्रपटसृष्टीला एक प्रतिभावान आणि सुंदर अभिनेत्री मिळाली आहे. तिच्या डान्स आणि सौंदर्याचे जलवे आपण सोशल मीडिया पाहतच असतो. अशातच तिने पुन्हा एकदा तिचे काही फोटो शेअर केले आहेत.
सोनालीने अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवरून तिचे काही फोटो शेअर केले आहेत. या फोटोमध्ये तुम्ही पाहू शकता की, तिने राखाडी रंगाचा टी-शर्ट आणि काळ्या पांढऱ्या रंगाचे शॉर्ट्स घातले आहेत. तसेच यावर तिने काळ्या रंगाचे जॅकेट घातले आहे. तसेच पायात पांढऱ्या रंगाचे शूज घातले आहेत. या ड्रेसमध्ये ती वेगवेगळ्या पोझ देताना दिसत आहे. (Marathi actress sonalee Kulkarni share her morden photos on social media)
तिचा हा लूक देखील तिच्या चाहत्यांना नेहमीप्रमाणेच खूप आवडला आहे. अनेकजण या फोटोवर त्यांच्या प्रतिक्रिया देत आहेत. तिच्या एका चाहत्याने या फोटोवर कमेंट केली आहे की, “ओ मेरी सोना रे सोना रे सोना,” तसेच आणखी एका चाहत्याने “हॉलिवूड इज कॉलिंग,” अशी कमेंट केली आहे. अशाप्रकारे तिच्या या फोटोवर कौतुकाचा वर्षाव होत आहे.
सोनालीच्या कामाबद्दल बोलायचे झाल्यास, सोनाली एक उत्कृष्ट अभिनेत्री आणि डान्सर देखील आहे. तिने अनेक चित्रपटात काम केले आहे. तिने तिच्या करिअरमध्ये ‘मितवा’, ‘नटरंग’, ‘हिरकणी’, ‘ग्रँड मस्ती’, ‘पोस्टर गर्ल’, ‘क्लासमेट’, ‘धुरळा’, ‘हंपी’, ‘शटर’, ‘अजिंठा’, ‘ती आणि ती’, ‘क्षणभर विश्रांती’, ‘मस्ती’, सिंघम रिटर्न्स’ यांसारख्या अनेक मराठी आणि हिंदी चित्रपटात काम केले आहे. यासोबतच ती लवकरच ‘तमाशा लाईव्ह’ या चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटाचा पोस्टर तिने काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर शेअर केला होता.
दैनिक बोंबाबोंचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-
-साधना शिवदासानी जगल्या ‘अशा’ प्रकारचे जीवन, ‘या’ कारणास्तव ठोकला होता अभिनयक्षेत्राला राम राम!










