मराठी चित्रपटसृष्टीतील अभिनेत्री आणि डान्सर सोनाली कुलकर्णी ही सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात सक्रिय असते. तिच्या व्यावसायिक आयुष्यासोबत ती तिच्या वैयक्तिक आयुष्यातील अनेक गोष्टी सोशल मीडियावर शेअर करत असते. मागील अनेक दिवसापासून सोशल मीडियावर तिचा वावर चांगलाच वाढला आहे. सातत्याने ती तिचे फोटो शेअर करत असते. अशातच तिचा बीचवरील एक फोटो समोर आला आहे.
सोनालीने अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवरून तिचा एक फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये ती समुद्रकिनारी दिसत आहे. सोनालीने निळ्या रंगाची बिकिनी घातलेली आहे. समुद्र किनारी ती एन्जॉय करताना दिसत आहे. सोनालीचा हा फोटो ती मालदीवला तिचा पती कुणालसोबत केली होती, तेव्हा काढलेला आहे. (Marathi actress sonalee Kulkarni share her photo on Instagram)
हा फोटो शेअर करून तिने कॅप्शन दिले आहे की, “तनहा तनहा यह कोई बात है.” तिने शेअर केलेला हा फोटो तिच्या चाहत्यांना आवडला आहे. अनेकजण हा फोटोवर त्यांच्या प्रतिक्रिया देत आहेत.
सोनालीच्या कामाबद्दल बोलायचे झाल्यास, सोनाली एक उत्कृष्ट अभिनेत्री आणि डान्सर देखील आहे. तिने अनेक चित्रपटात काम केले आहे. तिने तिच्या करिअरमध्ये ‘मितवा’, ‘नटरंग’, ‘हिरकणी’, ‘ग्रँड मस्ती’, ‘पोस्टर गर्ल’, ‘क्लासमेट’, ‘धुराळा’, ‘हंपी’, ‘शटर’, ‘अजिंठा’, ‘ती आणि ती’, ‘क्षणभर विश्रांती’, ‘मस्ती’, सिंघम रिटर्न्स’ यांसारख्या अनेक मराठी आणि हिंदी चित्रपटात काम केले आहे. यासोबतच ती लवकरच ‘तमाशा लाईव्ह’ या चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटाचा पोस्टर तिने काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर शेअर केला होता.
दैनिक बोंबाबोंचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-
-कैसे भुलू तुझे! सिद्धार्थच्या निधनाने अजून ही धक्क्यात आहे आसीम; सतत पाहतोय दोघांचे व्हिडिओ
-सायरा बानूंची आयसीयूमधून झाली मुक्तता; डिप्रेशन अन् ऍंजिओग्राफीबद्दल खुलासा करत डॉक्टर म्हणाले…