Sunday, June 8, 2025
Home मराठी अभिनेत्री सोनाली कुलकर्णीच्या सौंदर्यावर चाहती फिदा; म्हणाली, ‘खूप गोड दिसतेस नजर…’

अभिनेत्री सोनाली कुलकर्णीच्या सौंदर्यावर चाहती फिदा; म्हणाली, ‘खूप गोड दिसतेस नजर…’

अनेक चित्रपट,‌‌ नाटक आणि डान्स करून नावारूपाला आलेली सोनाली कुलकर्णी ही एक लोकप्रिय अभिनेत्री आहे. सोशल मीडियावर तिचे लाखोंनी चाहते आहेत. आजकाल तर तिचा सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात वावर वाढला आहे. तिच्या चाहत्यांशी जोडून राहण्याची एकही संधी ती सोडत नाही. आयुष्यातील प्रत्येक घटना ती सोशल मीडियावर शेअर करत असते. तिच्या निरनिराळ्या स्टाईलचे दर्शन आपल्याला इथून मागे झालेच आहे. अशातच तिचा एक स्टायलिश लूक समोर आला आहे.

सोनालीने अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवरून तिचे काही फोटो शेअर केले आहेत. या फोटोमध्ये आपण पाहू शकतो की, तिने चॉकलेटी रंगाचा एक सुंदर ड्रेस घातला आहे. तसेच तिने सोन्याचे दागिने घातले आहेत. या लूकमध्ये ती नेहमीप्रमाणेच खूप सुंदर दिसत आहे. (Marathi actress sonalee Kulkarni share her photo on social)

या फोटोमध्ये ती पीएनजीच्या सोन्याच्या दागिन्यांची जाहिरात करताना दिसत आहे. तिने घातलेला ड्रेस आणि दागिने तिला अगदी खुलून दिसत आहेत. तिचे चाहते देखील या फोटोवर त्यांच्या अनेक प्रतिक्रिया देत आहेत. या फोटोवर सोनालीच्या एका चाहतीने कमेंट केली आहे की, “खूप गोड दिसत आहेस, नजर काढून घेशील.” बाकी अनेक चाहते हार्ट ईमोजी पोस्ट करत आहेत.

सोनालीच्या कामाबद्दल बोलायचे झाल्यास, सोनाली एक उत्कृष्ट अभिनेत्री आणि डान्सर देखील आहे. तिने अनेक चित्रपटात काम केले आहे. तिने तिच्या करिअरमध्ये ‘मितवा’, ‘नटरंग’, ‘हिरकणी’, ‘ग्रँड मस्ती’, ‘पोश्टर गर्ल’, ‘क्लासमेट्स’, ‘धुरळा’, ‘हंपी’, ‘शटर’, ‘अजिंठा’, ‘ती आणि ती’, ‘क्षणभर विश्रांती’, ‘मस्ती’, सिंघम रिटर्न्स’ यांसारख्या अनेक मराठी आणि हिंदी चित्रपटात काम केले आहे.

यासोबतच ती लवकरच ‘तमाशा लाईव्ह’ या चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटाचा पोस्टर तिने काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर शेअर केला होता.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-‘स्पृहा तुला बघितल्यावर दिवस खूप छान जातो…’, स्पृहा जोशीच्या फोटोवर चाहत्यांची लक्षवेधी कमेंट

-नवरात्रीच्या आठव्या दिवशी अपूर्वा नेमळेकरने घेतले विद्येची देवता असणाऱ्या सरस्वती मातेचे रूप

-लाल रंगाच्या ड्रेसमध्ये गौतमी देशपांडेच्या सौंदर्याला बहर! ‘सावन में आग लग गयी’ म्हणत चाहत्याकडून कौतुक

हे देखील वाचा