Tuesday, July 9, 2024

‘पुरे झाला आता नथीचा नखरा, आता पाहा…’, सोनाली कुलकर्णीच्या आगळ्या- वेगळ्या लूकमधील फोटोंचा बोलबाला

अनेक चित्रपट,‌‌ नाटक आणि डान्स करून नावारूपाला आलेली अभिनेत्री सोनाली कुलकर्णी ही एक लोकप्रिय अभिनेत्री आहे. सोशल मीडियावर तिचे लाखोंनी चाहते आहेत. आजकाल तर तिचा सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात वावर वाढला आहे. तिच्या चाहत्यांशी जोडून राहण्याची एकही संधी ती सोडत नाही. आयुष्यातील प्रत्येक घटना ती सोशल मीडियावर शेअर करत असते. तिच्या निरनिराळ्या स्टाईलचे दर्शन आपल्याला इथून मागे झालेच आहे. अशातच तिचा एक स्टयलिश लूक समोर आला आहे.

नुकतेच सोनालीने इंस्टाग्रामवर तिचे काही फोटो शेअर केले आहेत. या फोटोमध्ये तुम्ही पाहू शकता की, तिने लाल रंगाची पँट आणि ब्लेझर घातले आहे. तिने हा काहीशा प्रमाणात वेगळा आणि स्टायलिश लूक करायचा प्रयत्न केला आहे. या सोबत तिने नाकात शाही नथ घातली आहे. तसेच केसांची वेगळ्या पद्धतीने वेणी घातली आहे. या फोटोमध्ये ती खूपच आकर्षक दिसत आहे. (Marathi actress sonalee Kulkarni share her photo on social media)

हे फोटो शेअर करून तिने लिहिले आहे की, “पुरे झाला आता नथीचा नखरा, आता पाहा माझ्या नथीचा रुबाब.” तिचा हा लूक तिच्या बऱ्याच चाहत्यांना आवडला आहे. अनेकजण या फोटोवर त्यांच्या प्रतिक्रिया देत आहेत. सोनालीचा हा लूक ‘महाराष्ट्राची हास्य जत्रा’ या शोमधील आहे. येत्या आठवड्यात ती या शोमध्ये दिसणार आहे.

सोनालीच्या कामाबद्दल बोलायचे झाल्यास, सोनाली एक उत्कृष्ट अभिनेत्री आणि डान्सर देखील आहे. तिने अनेक चित्रपटात काम केले आहे. तिने तिच्या करिअरमध्ये ‘मितवा’, ‘नटरंग’, ‘हिरकणी’, ‘ग्रँड मस्ती’, ‘पोस्टर गर्ल’, ‘क्लासमेट’, ‘धुरळा’, ‘हंपी’, ‘शटर’, ‘अजिंठा’, ‘ती आणि ती’, ‘क्षणभर विश्रांती’, ‘मस्ती’, सिंघम रिटर्न्स’ यांसारख्या अनेक मराठी आणि हिंदी चित्रपटात काम केले आहे. यासोबतच ती लवकरच ‘तमाशा लाईव्ह’ या चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटाचा पोस्टर तिने काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर शेअर केला होता.

दैनिक बोंबाबोंचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-श्रुती मराठेच्या डॅशिंग लूकमधील फोटोने वेधले चाहत्यांचे लक्ष; कुणाला आवडला ड्रेस, तर कुणाला तिचा लूक

-गौतमी देशपांडेच्या ऑफ शोल्डर ड्रेसमधील फोटोने अमृता खानविलकरलाही घातली भुरळ; कमेंट करत म्हणाली…

-‘माझ्यावर विश्वास ठेवून तुम्ही माझ्यासाठी…’, म्हणत भरत जाधवने दिल्या महेश कोठारेंना वाढदिवसाच्या शुभेच्छा

हे देखील वाचा