Tuesday, July 9, 2024

पतीसोबतच्या फोटोवर युजरने केली ‘अशी’ कमेंट, ती पाहून सोनालीला द्यावी लागली त्याला प्रतिक्रिया

अभिनेत्री सोनाली कुलकर्णी हिचा सोशल मीडियावरील वावर खूप वाढला आहे. सातत्याने ती तिच्या चाहत्यांसाठी काहीतरी नवीन शेअर करत असते. सध्या ती तिचा पती कुणालसोबत दुबईमध्ये आहे. तेथील काही फोटो तिने सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

सोनालीने नुकतेच सोशल मीडियावर तिच्या पतीसोबत काही फोटो शेअर केले आहेत. या फोटोमध्ये त्यांच्या मागे दुबईचा शानदार नजारा दिसत आहे. फोटोमध्ये आपण पाहू शकतो की, सोनालीने पिवळ्या रंगाचा ऑफ शोल्डर क्रॉप टॉप आणि डेनिमचा स्कर्ट घातला आहे. तसेच तिच्या पतीने टी-शर्ट आणि जिन्स घातली आहे. या फोटोमध्ये ते दोघे वेगवेगळ्या पोझ देताना दिसत आहेत. ( Marathi actress Sonalee Kulkarni share her photo with her husband)

हे फोटो शेअर करून तिने लिहिले आहे की, “माझ्या प्रेमाच्या सहवासात,” त्यांचे हे गोड फोटो अनेकांना खूप आवडले आहेत. दिग्दर्शक सिद्धार्थ मल्होत्रा याने या फोटोवर “वाह वाह” अशी कमेंट केली आहे. तसेच तिचे चाहते देखील या फोटोवर कमेंट करत आहेत. तिच्या एका चाहत्याने या फोटोवर कमेंट केली आहे की, “दृष्ट लागण्या जोगे सारे.”

यासोबतच तिच्या एका चाहत्याने कमेंट केली आहे की, “मालदीववरून आले नाही की, लगेच दुबईला. एन्जॉय एन्जॉय.” खास गोष्ट म्हणजे या कमेंटवर सोनालीने रिप्लाय देखील दिला आहे. तिने लिहिले आहे की, “मालदीववरून येऊन अडीच महिने झाले. आल्यानंतर मुंबईत एक चित्रपट केला आणि मग आले नवऱ्याकडे दुबईला.” यासोबत बाकी अनेक चाहते या फोटोवर त्यांच्या प्रतिक्रिया देत आहेत.

सोनालीच्या कामाबद्दल बोलायचे झाल्यास, सोनाली एक उत्कृष्ट अभिनेत्री आणि डान्सर देखील आहे. तिने अनेक चित्रपटात काम केले आहे. तिने तिच्या करिअरमध्ये ‘मितवा’, ‘नटरंग’, ‘हिरकणी’, ‘ग्रँड मस्ती’, ‘पोश्टर गर्ल’, ‘क्लासमेट’, ‘धुरळा’, ‘हंपी’, ‘शटर’, ‘अजिंठा’, ‘ती आणि ती’, ‘क्षणभर विश्रांती’, ‘मस्ती’, सिंघम रिटर्न्स’ यांसारख्या अनेक मराठी आणि हिंदी चित्रपटात काम केले आहे. यासोबतच ती लवकरच ‘तमाशा लाईव्ह’ या चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटाचा पोस्टर तिने काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर शेअर केला होता.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-मिथिला पालकरचा स्टायलिश लूक घालतोय सोशल मीडियावर धुमाकूळ, हटके पोझने वेधले नेटकऱ्यांचे लक्ष

-किती गोड! सोज्वळ मयुरीचा ग्लॅमरस अंदाजाने चाहत्यांना भुरळ, चाहत्यांकडून कौतुकाचा वर्षाव

-दुःखद बातमी! प्रसिद्ध संगीतकार प्रभाकर जोग यांचे निधन, ८९ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

हे देखील वाचा