Wednesday, June 26, 2024

पालक दिनानिमित्त आई- वडिलांवर प्रेम व्यक्त करताना दिसली ‘अप्सरा’ सोनाली कुलकर्णी! खास पोस्ट होतेय व्हायरल

मुलांच्या जीवनाला आकार देण्याचे काम पालक करतात. पालकांचे मुलांच्या आयुष्यातील महत्त्व शब्दात सांगणे खूपच कठीण आहे. सर्वांचे आपल्या आई वडिलांवर जिवापाड प्रेम असते आणि मुलं हे प्रेम व्यक्त करण्याची संधी शोधत असतात. नुकतेच जागतिक पालक दिनाच्या निमित्ताने सर्वांना ही संधी मिळाली. याच संधीचा फायदा मराठीमोळी ‘अप्सरा’ अर्थातच सोनाली कुलकर्णीनेही घेतलेला पाहायला मिळाला.

आज म्हणजेच मंगळवारी (१ जून) सर्वत्र जागतिक पालक दिन साजरा केला जात आहे. या खास निमित्ताने बऱ्याच कलाकारांनी, सोशल मीडियावर आपल्या आई वडिलांचा फोटो शेअर करून त्यांच्यावरचे प्रेम व्यक्त केले आहे. त्याचप्रमाणे अभिनेत्री सोनालीनेही तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर फोटो शेअर केला आहे.

सोनालीने शेअर केलेल्या या फोटोमध्ये तिच्यासोबत तिचे आई वडील दिसत आहेत. यात तिच्या आई वडिलांच्या हातात एक पुरस्कारही दिसत आहे. तसेच हा खास फोटो शेअर करत अभिनेत्रीने कॅप्शनमध्ये लिहिले आहे, “जगातला सगळ्यात अमूल्य पुरस्कार…आपल्या आई बाबांचा आशिर्वाद.” पालक दिनानिमित्त शेअर केलेल्या या फोटोला चाहत्यांकडून चांगलीच पसंती मिळत आहे.

सोनाली कुलकर्णीच्या वर्क फ्रंटबद्दल बोलायचे झाले, तर ती ‘झिम्मा’ या आगामी चित्रपटात दिसणार आहे. त्याचबरोबर, ‘छत्रपती ताराराणी’ आणि ‘फ्रेश लाईम सोडा’ हे आगामी चित्रपटही तिच्या खात्यात आहेत.

सोनालीच्या कारकिर्दीबद्दल बोलायचे म्हणले, तर कारकिर्दीच्या प्रारंभी तिने एक मॉडेल म्हणून काम केले. त्यांनतर केदार शिंदे यांच्या ‘बकुळा नामदेव घोटाळे’ या चित्रपटामधून तिने चित्रसृष्टीमध्ये पदार्पण केले. या चित्रपटाकरिता तिला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा झी गौरव पुरस्कार देण्यात आला. सोनाली ती मुळची पुण्याची आहे. ती ‘नटरंग’ चित्रपटामधील ‘अप्सरा आली’ ह्या लावणीनृत्यासाठी साठी विशेष ओळखली जाते.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हे देखील वाचा