Tuesday, July 9, 2024

डोक्यावर ‘हॅट’ घालून सायकलवर फिरायला निघाली सोनाली कुलकर्णी; दिसतेय एकच नंबर

आजकाल सोनाली कुलकर्णी आणि सोशल मीडिया हे एक समीकरण झाले आहे. दर दिवशी ती तिचे फोटो चाहत्यांसाठी शेअर करत असते. तिच्या चाहत्यांना देखील तिचे हे फोटो खूप आवडतात असतात. ते तिच्या फोटोंना नेहमीच प्रतिक्रिया देत असतात. अशातच तिचा आणखी एक फोटो समोर आला आहे.

सोनालीने अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवरून एक फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये तुम्ही पाहू शकता की, तिने रंगीबेरंगी टॉप आणि काळया रंगाचा नेटचा स्कर्ट घातलेला आहे. या फोटोमध्ये ती सायकल चालवताना दिसत आहे. तसेच तिच्या डोक्यावर तिने हॅट घातलेली आहे. तिने शेअर केलेला हा फोटो मालदीवमधील आहे. या फोटोमध्ये ती खूपच छान दिसत आहे. (Marathi actress sonalee kulkarni’s photo viral on social media)

सोनालीने शेअर केलेल्या या फोटोवर तिचे चाहते सातत्याने कमेंट करत आहेत. नेहमी प्रमाणेच चाहत्यांना हा फोटो देखील आवडला आहे. काही दिवसांपूर्वी सोनाली तिचा पती कुणाल बेनोडकर सोबत मालदीवला गेली होती. तिथे तिने हे फोटो शूट केले आहे.

सोनालीच्या कामाबद्दल बोलायचे झाल्यास, सोनाली एक उत्कृष्ट अभिनेत्री आणि डान्सर देखील आहे. तिने अनेक चित्रपटात काम केले आहे. तिने तिच्या करिअरमध्ये ‘मितवा’, ‘नटरंग’, ‘हिरकणी’, ‘ग्रँड मस्ती’, ‘पोस्टर गर्ल’, ‘क्लासमेट’, ‘धुराळा’, ‘हंपी’, ‘शटर’, ‘अजिंठा’, ‘ती आणि ती’, ‘क्षणभर विश्रांती’, ‘मस्ती’, सिंघम रिटर्न्स’ यांसारख्या अनेक मराठी आणि हिंदी चित्रपटात काम केले आहे. यासोबतच ती लवकरच ‘तमाशा लाईव्ह’ या चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटाचा पोस्टर तिने काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर शेअर केला होता.

दैनिक बोंबाबोंचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

सिद्धार्थ शुक्लाच्या मृत्यनंतर एजाज खानने मागितली माफी; म्हणाला, ‘जर मी तुझ्याशी…’

-सिद्धार्थ शुक्ला मृत्यू प्रकरणात मुंबई पोलिसांनी नोंदवला एडीआर, डॉक्टरांनी ‘या’ मृत्यूची वर्तवली शक्यता

-कधी ओपन शर्ट, तर कधी जंगलात बिकीनी घालून पोझ देतेय अदाकारा; वेड लावतोय मौनीचा हा कातीलाना अंदाज

हे देखील वाचा