खरोखर पूर म्हणजे पाण्याचे रौद्र रूप होय. कधी डोंगरावर मुसळधार पाऊस होतो आणि वितळलेल्या बर्फामुळे किनारपट्टीच्या प्रदेशात पूराचे प्रलयकारी तांडव नृत्य सुरू होते. तर कधी एखाद्या नदीवरील धरण फुटल्याने किंवा ढगफुटी झाल्याने अचानक पूर येतो. जेव्हा निसर्ग पुराच्या रुपात आपले रौद्र रूप दाखवतो, तेव्हा सर्वत्र विनाश, दु: ख आणि निराशेची हृदयस्पर्शी दृश्ये दिसतात. असाच काहीसा प्रकार गेल्या काही दिवसांत आपल्याला कोकणात पाहायला मिळाला आहे. निसर्गाने त्याचे महाभयंकर रूप धारण केले आणि सर्व जनजीवन विस्कळीत करून टाकले.
पुरग्रस्त भागात अनेक माणसे, प्राणी आणि पक्षी मरण पावली आहेत. महिला आणि मुले असहाय्य आणि बेवारस झाली. असंख्य लोकं बेघर झाले. त्यांच्याकडे परिधान करण्यासाठी कपडेदेखील उरले नाही, पूरक आहार आणि पिण्याचे पाणीदेखील मिळणे अवघड झाले आहे. अनेक मार्ग आणि पूल तुटले. आसपासच्या अनेक गावांशी संपर्क देखील तुटला. पुरामुळे संपूर्ण आयुष्य उध्वस्त झाले आणि लाखोंची संपत्ती माती माती होऊन गेली. या कठीण काळात बरेच लोक पुरग्रस्त भागातील लोकांच्या मदतीसाठी पुढे आले आहेत. काही कलाकार देखील यावेळी मदतीसाठी धावून आलेले पाहायला मिळाले. (marathi actress sonali kulkarni gave helping hand to needy people in flood)
अशातच आता सुप्रसिद्ध मराठमोळी अभिनेत्री सोनाली कुलकर्णीने देखील गरजूंसाठी मदतीचा हात पुढे केला आहे. या संबंधित पोस्ट तिने तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवर शेअर केली आहे. अभिनेत्रीने तिच्या ट्विटर हॅंडलवरून एक फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये तुम्ही पाहू शकता की, सोनाली एका ट्रकच्याजवळ उभी आहे, ज्यामध्ये पुरग्रस्तांसाठी गरजेचं सामान आहे. शिवाय तिच्यासोबत आणखी काही व्यक्ती या फोटोमध्ये पाहायला मिळत आहेत.
आज आपलं शहर वाचलंय, पण आपले शेजारी उध्वस्त झाले आहेत ..म्हणून आम्ही शेजारपाजाऱ्यांनी मिळून छोटी मदत जमवली ???????? धन्यवाद अशोक माटेकरजी ???? pic.twitter.com/drttQiuE82
— sonalikulkarni (@sonalikulkarni) August 10, 2021
हा फोटो शेअर करून तिने कॅप्शनमध्ये लिहिलंय की, “आज आपलं शहर वाचलंय, पण आपले शेजारी उध्वस्त झाले आहेत ..म्हणून आम्ही शेजारपाजाऱ्यांनी मिळून छोटी मदत जमवली.” अभिनेत्रीच्या या पोस्टवर आता युजर्सच्या मोठ्या प्रमाणात प्रतिक्रिया उमटत आहेत. ही कामगिरी पाहून चाहते तिचे भरभरून कौतुक करत आहेत.
दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-
-रूबीना दिलैकच्या नवीन गाण्याला भरभरून प्रतिसाद; अभिनेत्रीने पोस्ट शेअर करत मानले चाहत्यांचे आभार
-आनंदाची बातमी! अभिनेत्री नयनताराने केली साखरपुड्याची पुष्टी; जाणून घ्या कोण आहे तो नशीबवान?
-सोनू अभिनेत्रीसोबत करत होता ‘तुम तो ठहरे परदेसी’ गाण्यावर डान्स; मध्येच आला चाहता आणि…