Wednesday, December 18, 2024
[aioseo_breadcrumbs]

‘जेव्हा स्री कडकलक्ष्मीचं रूप घेते’, सोनाली कुलकर्णीने शेअर केलेली ‘ती’ पोस्ट सोशल मीडियावर चर्चेत

सोनाली कुलकर्णी (Sonali Kulkarni)  ही मराठी सिने जगतातील एक लोकप्रिय अभिनेत्री म्हणून ओळखली जाते. आपल्या दमदार अभिनयाने आणि घायाळ करणाऱ्या सौंदर्याने सिने जगतात स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. आपल्या अभिनयाइतकीच सोनाली सोशल मीडियावरही नेहमीच सक्रिय असते. ज्यावरुन ती नेहमीच आपले बोल्ड फोटो शेअर करताना दिसत असते. सध्या सोनाली कुलकर्णीची एक सोशल मीडिया पोस्ट चांगलीच व्हायरल होत आहे ज्यामध्ये तिने तिच्या आगामी चित्रपटात गाणे गायला मिळाल्याचे सांगितली आहे. 

मराठी सिने जगतातील अप्सरा म्हणून ओळखली जाणारी सोनाली कुलकर्णी सध्या तिच्या आगामी तमाशा लाईव्ह चित्रपटामुळे चांगलीच चर्चेत आली आहे. सोशल मीडियावरुन ती या चित्रपटाचे जोरदार प्रमोशन करताना दिसून येत आहे. सध्या सोनालीची अशीच एक सोशल मीडिया पोस्ट सर्वत्र व्हायरल होत आहे. ज्यामध्ये सोनालीने तिच्या तमाशा लाईव्ह चित्रपटातील लूक शेअर केला आहे. सोनालीने आपल्या अधिकृत ट्विटर अकाउंटवरुन हे ट्विट केले आहे.

ज्यामध्ये ती म्हणते की, “पहिल्यांदाच सिनेमातल्या आपल्या पात्रासाठी पार्श्वगायन करण्याची संधी मिळाली आणि ती देखील अश्या गाण्यासाठी,स्वतःला सिद्ध करू पाहणाऱ्या प्रत्येक मुलीच्या मनातलं, जेव्हा स्री कडकलक्ष्मी चं रूप घेते,” असा आकर्षक कॅप्शन दिला आहे. या पोस्टसोबत सोनालीने गाण्याची लिंकही शेअर केली आहे. सोनालीने पोस्ट केलेल्या फोटोंमध्ये ती खूपच रागात असल्याचे वाटत आहे. सध्या तिच्या या लूकची सर्वत्र चर्चा रंगली आहे.

हेही वाचा- 

TMKOC | ‘टप्पू’नेही मध्येच सोडला शो? ‘या’ कलाकाराने उघडली अनेक गुपितं

‘या’ कॉमेडीयनने बिल्डरला लावला २० लाखांचा चुना, पोलिसांनी पाठवली नोटीस

आपल्या मुलीला आमिर अलीशी भेटून देत नाहीये संजीदा शेख, केला ‘हा’ मोठा दावा

 

 

,

हे देखील वाचा