Thursday, July 31, 2025
Home मराठी भारतातील मुलींच्या लग्नाच्या अवाजवी अपेक्षेवर सोनाली कुलकर्णी म्हणाली “मुलगा हवाय की मॉलमधील ऑफर?

भारतातील मुलींच्या लग्नाच्या अवाजवी अपेक्षेवर सोनाली कुलकर्णी म्हणाली “मुलगा हवाय की मॉलमधील ऑफर?

मराठमोळी अभिनेत्री सोनाली कुलकर्णी ही आघाडीच्या अभिनेत्रींपैकी एक आहे. तिने मराठी, हिंदी, इंग्रजी, इटालियन, बंगाली, तामीळ, तेलगू, अशा 7 वेगवेगळ्या भाषांमधील चित्रपटामध्ये अभिनेत्रीने काम केले आहे. तिने तिच्या अभिनयाने एक विशेष ओळख निर्माण केली आहे. ती सोशल मीडियावर देखील खूप सक्रिय आहे. तसेच अभिनेत्री विविध कार्यक्रमांना हजेरी लावत असते. त्याचप्रमाणे ती नेहमी परखड मत ती मांडत असते. नुकत्याच एका कार्यक्रमाला तिने हजेरी लावली होती. यात तिने मुलींची लग्नाबाबतची अवाजवी अपेक्षा आणि मागणी याबद्दल बोलतानाचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. चाल तर बघूया अभिनेत्री नक्की काय म्हणाली आहे?

अभिनेत्री सोनाली कुलकर्णी (Actress sonali kulkarni) ही तिच्या चित्रपटांमुळे चर्चेत असते. तिच्या अभिनायचे कौतुकही केले जाते. ती नेहमी तिचे ठाम मत मांडत असते. असाच तीचा एक व्हिडीओ सोशल मिडियावर सध्या जोरदार व्हायरल होत आहे.

या व्हिडीओ मध्ये अभिनेत्रीने म्हंटले आहे की, ”भारतातील खुप बऱ्याच मुली आळशी आहे. त्यांना एक असा बॉयफ्रेंड किवा नवरा पाहिजे, ज्याच्याकडे घर, चांगली नोकरी आणि पगार वाढण्याची खात्री असेल. पण त्या मुलीमध्ये एवढी हिंमत नसते की, ती म्हणेल जेव्हा तू माझ्यासोबत लग्न करशील तेव्हा मी आपल्या दोघांसाठी काय करु शकते?”

पुढे ती म्हणते, सगळ्यांना विनंती आहे की, ”तुमच्या घरात स्त्रीला अशी समान वागणूक द्या की, ती सक्षम होईल, स्वतःसाठी कमवू शकेल, जी म्हणेल की घरात नवीन फ्रीज घ्यायचा असेल तर ती म्हणेल की, अर्धे पैसे मी देते आणि अर्धे पैसे तु दे.”

अभिनेत्री पुढे तिच्या मैत्रीणीबद्दल सांगते की, “माझी दूरची मैत्रीण लग्नासाठी मुलगा बघत होती. तिने मला सांगितले की, 50 हजार पगारापेक्षा कमी पगार असलेली नोकरी तर नकोच, तो वेगळा राहायला पाहिजे, सासू सासऱ्यांची कटकट नको, त्याच्याकडे चारचाकी गाडी तर हवीच. यावर ती म्हणाली की, तु एखाद्या माॅलमध्ये आली आहे का? तुला एक मुलगा हवाय की ऑफर्स? हे किती अपमानास्पद आहे.”
मला अस वाटत की, “मूल जेव्हा १८ वर्षांचे होतात तेव्हा, त्यांच्यावर एक दबाव असतो की, आता शिक्षण पूर्ण होणार आहे…बस झाली आता मजा मस्ती…आता पैसे कमवून घ्या, कुटुंबाला सहाय्य करा…यावर मला फार वाईट वाटत आणि रडायला येते माझ्या भावांसाठी आणि नवऱ्यासाठी.”
ती म्हणते की, “माझ्या नवऱ्याचे कॅम्पस इंटरव्ह्युमध्ये सिलेक्शन झाले होते. 20 व्या वर्षापासून माझा नवरा कमवायला लागला. का? मुली 25…27 वर्षांच्या होईपर्यंत विचारच करत असतात. मुली बॉयफ्रेंडवर प्रेशर टाकत असतात की, हनिमून भारतात नाही तर परदेशातच झाल पाहिजे. आता तर विचारूच नका डेस्टिनेशन वेडिंग, प्री वेडिंग, शूट आणि रील्स याचा सर्व खर्च बॉयफ्रेंड किवा होणारा नवराच करणार. जर तुम्हांला ऐशो आरामात जीवन जगायचे असेल तर तुम्ही कधी कमावणार? “

पुढे मुलींना सल्ला देत सोनाली म्हणते की, “तुम्ही खुप शिका, नोकरी करा, चार ऑफिसमध्ये जाऊन विचारा की मला काम मिळू शकत का?  अस होतांना दिसत नाही. अनेक मुलीचे कौतुक केल्यावरही त्या एचआरकडे तक्रार करत असतात. त्याने म्हटलं की असे कपडे का घातले? पण जरा थांबा, आधी त्यांचं पूर्ण म्हणणं तर ऐकून घ्या. खरं तर सगळ्या मुली, महिला अशा असतात असं नाही. पण हे अग्रेशन आणि सतत मागण्या करणारा स्वभाव असलेल्या मुली झपाट्याने वाढत आहेत. मला वाटतं की आपण काही गोष्टींकडे थोडं नम्रता व समानतेनं बघावं. कारण मुलीहींची कुटुंबाप्रती जबाबदारी असतेच. बिलं भरणं, हे फक्त तुमच्या नवऱ्याचं काम नाही. कधीतरी तुमच्या नवऱ्याला म्हणा, पुढचे सहा महिने त्याला सुट्टी आहे आणि त्याच्या चेहऱ्यावरचं हसू बघा,” असं सोनालीने म्हटलंय.”

“माझ्या आयुष्यातील सर्व पुरुषांचा मला अभिमान आहे. मला त्यांची काळजी वाटते. जेवण बनवण्याशिवायही कुटुंब किंवा जोडीदारासाठी करता येतील, अशा बऱ्याच गोष्टी आहेत. सरकारने एखाद्या क्षेत्रात आरक्षण दिलंय ती वेगळी गोष्टी आहे, ती त्यांची जबाबदारी आहे व ते पार पाडत आहेत. त्याचप्रमाणे काही जबाबदाऱ्या आपल्याही असतात. महिलांनीही त्या जबाबदाऱ्या ओळखण्याची गरज आहे,” असं मत सोनालीने व्यक्त केलं.(marathi actress sonali kulkarni viral video talk about indian girls thinking and marriage)

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
फॅशन डिझायनरने दिली अमृता फडणवीस यांना धमकी, नेमके काय आहे प्रकरण? एकदा जाणून घ्याच
नकारात्मक भूमिकांमधून ओळख मिळवलेल्या अनन्याने प्रभावी अभिनयाच्या जोरावर कोरले राष्ट्रीय पुरस्कारावर नाव

हे देखील वाचा