Sunday, February 23, 2025
Home मराठी ‘स्पृहा तुला बघितल्यावर दिवस खूप छान जातो…’, स्पृहा जोशीच्या फोटोवर चाहत्यांची लक्षवेधी कमेंट

‘स्पृहा तुला बघितल्यावर दिवस खूप छान जातो…’, स्पृहा जोशीच्या फोटोवर चाहत्यांची लक्षवेधी कमेंट

अभिनेत्री स्पृहा जोशी चित्रपटसृष्टीतल्या प्रतिभावान कलाकारांपैकी एक आहे. तिने अनेक चित्रपटात उत्तम कामगिरी करत, रसिकांची मने जिंकली आहेत. अभिनेत्री सोशल मीडियावरही खूप सक्रिय असते. वेगवेगळ्या पोस्ट शेअर करत ती चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करते. बऱ्याचदा ती तिच्या लिखाणामुळे चर्चेत येत असते. तसेच अनेकवेळा ती सोशल मीडियावर तिचे फोटो आणि व्हिडिओ शेअर करत असते. अशातच तिचा एक फोटो चांगलाच व्हायरल होताना दिसत आहे.

स्पृहाने अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवरून एक फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये तिने चॉकलेटी रंगाची साडी घातली आहे. तसेच काळ्या रंगाचा फुल ब्लाऊज घातला आहे. तसेच गळ्यात चॉकलेटी रंगाची ज्वेलरी घातली आहे. तसेच केसांची सुंदर हेअर स्टाईल केली आहे. या फोटोमध्ये ती खूपच सुंदर दिसत आहे. (Marathi actress spruha Joshi share her photo on social media)

तिच्या या फोटोवर अनेकांच्या प्रतिक्रिया येत आहेत. या फोटोवर भाग्यश्री लिमये हिने “माय गॉड,” अशी कमेंट केली आहे. आणखी एका चाहत्याने “अप्रतिम सुंदर आहेस तू,” अशी कमेंट केली आहे. दुसऱ्या एकाने लिहिले आहे की, “स्पृहा तुला बघितल्यावर दिवस खूप छान जातो.”

स्पृहा तिच्या कवितेमुळे अनेकदा चर्चेतही येत असते. तिने ‘मोरया’, ‘पैसा पैसा’ अशा चित्रपटात अभिनय करून बरीच प्रसिद्धी मिळवली. तिने २००४ साली आलेल्या ‘माय बाप’मधून मराठी सिनेसृष्टीत पाऊल ठेवले होते. तिने बऱ्याच नाटकातही काम केले आहे. शिवाय तिने अलीकडेच ‘रंगबाझ फिरसे’द्वारे ओटीटीवर देखील पदार्पण केले आहे. अभिनयासोबत स्पृहा एक उत्तम सूत्रसंचालिका देखील आहे. तिने ‘सूर नाव ध्यास नवा’ या गायनाच्या शोचे सूत्रसंचालन केले आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-नवरात्रीच्या आठव्या दिवशी अपूर्वा नेमळेकरने घेतले विद्येची देवता असणाऱ्या सरस्वती मातेचे रूप

-लाल रंगाच्या ड्रेसमध्ये गौतमी देशपांडेच्या सौंदर्याला बहर! ‘सावन में आग लग गयी’ म्हणत चाहत्याकडून कौतुक

-‘ऋतुजा लग्न करशील का माझ्याशी?’, अभिनेत्रीची सोज्वळता पाहून चाहत्याने ठेवला थेट लग्नाचा प्रस्ताव

हे देखील वाचा