अभिनेत्री स्पृहा जोशी चित्रपटसृष्टीतल्या प्रतिभावान कलाकारांपैकी एक आहे. तिने अनेक चित्रपटात उत्तम कामगिरी करत, रसिकांची मने जिंकली आहेत. अभिनेत्री सोशल मीडियावरही खूप सक्रिय असते. वेगवेगळ्या पोस्ट शेअर करत ती चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करते. बऱ्याचदा ती तिच्या लिखाणामुळे चर्चेत येत असते. तसेच अनेकवेळा ती सोशल मीडियावर तिचे फोटो आणि व्हिडिओ शेअर करत असते. अशातच तिचा एक फोटो चांगलाच व्हायरल होताना दिसत आहे.
स्पृहाने अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवरून तिचा साडीमधील एक फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये तुम्ही पाहू शकता की, तिने पांढऱ्या रंगाची साडी नेसली आहे. तसेच यावर तिने लाल रंगाचा ब्लाऊज घातला आहे. केस मोकळे सोडून तिने कपाळावर एक छोटीसी टिकली लावली आहे. तिच्या एका बाजूने सूर्याची किरणे येताना दिसत आहेत. ज्यामुळे तिचा हा फोटो खूपच सुंदर दिसत आहे. (Marathi actress spruha Joshi share her saree look photo on social media)
तिचे चाहते या फोटोवर लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव करताना दिसत आहे. एका चाहत्याने या फोटोवर “नुसता जलवा,” अशी कमेंट केली आहे. तसेच बाकी अनेक चाहते या फोटोवर त्यांच्या प्रतिक्रिया देत आहेत. तिचा हा सोज्वळ लूक तिच्या चाहत्यांना खूप आवडला आहे.
अभिनयासोबत स्पृहाला कविता लिहिण्याची देखील आवड आहे. अभिनेत्री सोशल मीडियाच्या माध्यमातून तिची ही कला बऱ्याचदा चाहत्यांसमोर सादर करताना दिसते. स्पृहा तिच्या कवितेमुळे अनेकदा चर्चेतही येत असते. स्पृहाने ‘मोरया’, ‘पैसा पैसा’ अशा चित्रपटात अभिनय करून बरीच प्रसिद्धी मिळवली. तिने २००४ साली आलेल्या ‘माय बाप’ मधून मराठी सिनेसृष्टीत पाऊल ठेवले होते. तिने बऱ्याच नाटकातही काम केले आहे. शिवाय तिने अलीकडेच ‘रंगबाझ फिरसे’ द्वारे ओटीटीवर देखील पदार्पण केले आहे. अभिनयासोबत स्पृहा एक उत्तम सूत्रसंचालिका देखील आहे. तिने ‘सूर नाव ध्यास नवा’ या गायनाच्या शोचे सूत्रसंचालन केले आहे.
दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-
-आनंद गगनात मावेना! तब्बल ‘इतके’ फॉलोव्हर्स पूर्ण झाल्याच्या आनंदात ऋताने शेअर केली खास पोस्ट
-‘सफर खूबसूरत है, मंजिल से भी…’, म्हणत पाठक बाईंनी साडीमध्ये दाखवला दिलकश अंदाज