मराठीमधील ‘होणार सून मी घरची’ या मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला एक सुंदर आणि सोज्वळ अशी अभिनेत्री आली होती. तिच्या अभिनयाची जादू एवढी आहे की, अजूनही त्या मालिकेतील तिचा अभिनय कोणताही प्रेक्षक विसरू शकला नाही. तिने महाराष्ट्रातील प्रत्येकाच्या मनावर राज्य केले आहे. ती अभिनेत्री म्हणजे सर्वांची लाडकी तेजश्री प्रधान होय. तेजश्रीने अनेक मालिका, चित्रपट आणि नाटकांमध्ये काम करून प्रेक्षकांची मने जिंकली आहे. तेजश्री सोशल मीडियावर देखील मोठ्या प्रमाणात सक्रिय असते. अशातच तिचा एक गोड फोटो सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे
तेजश्रीने अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवरून तिचा एक फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये तुम्ही पाहू शकता की, तेजश्री खूपच सुंदर आणि अगदी सिंपल दिसत आहे. तिने गुलाबी रंगाचा एक सुंदर ड्रेस परिधान केला आहे. तिने कानात मोठे झुमके घातले आहेत. तसेच कपाळावर एक छोटीशी टिकली लावली आहे. या फोटोमध्ये ती फारच सालस दिसत आहे. (Marathi actress tejashri pradhan Share her beautiful and simple photo on social media)
हा फोटो शेअर करून तिने लिहिले आहे की, “या फोटोसाठी कॅप्शन सुचवा.” तिच्या या फोटोवर तिचे अनेक चाहते तसेच कलाकार त्यांच्या प्रतिक्रिया देत आहेत. या फोटोवर अभिनेत्री श्रेया बुगडे हिने “सुंदरा” अशी कमेंट केली आहे, तर नंदिता पाटकर हिने “ओएमजी” अशी कमेंट केली आहे. यासोबतच तेजश्रीच्या एका चाहत्याने “झुमका बरेली वाला कानो में ऐसा डाला.” अशी कमेंट केली आहे. आणखी एका चाहत्याने कमेंट केली आहे की, “तुला पाहता आजही हासते या मनी चांदणे.” अशाप्रकारे तिच्या या फोटोवर कौतुकाचा वर्षाव चालू आहे.
तेजश्रीने अनेक मालिकांमध्ये काम केले आहे. पण तिची होणार ‘सून मी या घरची’ ही मालिका संपूर्ण महाराष्ट्रात खूप गाजली होती. या मालिकेतील तिच्या जान्हवी नावाच्या पात्राला खूप पसंती मिळाली होती. तसेच तिची ‘अगंबाई सासूबाई’ ही मालिका देखील खूप लोकप्रिय झाली होती. या मालिकेतील तिचे शुभ्रा नावाचे अत्यंत समंजस, विचारी आणि प्रॅक्टिकल पात्र प्रेक्षकांना खास पसंत पडले होते. याशिवाय तिने ‘लेक लाडकी या घरची’, ‘या गोजिरवाण्या घरात’ या मालिकांमध्ये काम केले आहे. तसेच तिने ‘ती सध्या काय करते’, ‘असेही एकदा व्हावे’, ‘लग्न पहावे करून’, ‘झेंडा’, ‘शर्यत’, ‘डॉक्टर प्रकाश बाबा आमटे’ यांसारख्या चित्रपटात काम केले आहे.
दैनिक बोंबाबोंचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-
-‘कू’ ऍपवरही कंगना रणौत गाजवतेय वर्चस्व; काही दिवसांतच मिळवले तब्बल ‘इतके’ फॉलोव्हर्स
-‘हा निव्वळ पब्लिसिटी स्टंट’, म्हणत मनोज पाटील आत्महत्या प्रकरणावर साहिल खानने सोडले मौन
-शूटिंग सोडून तुर्कीमध्ये ‘हे’ काम करताना दिसली बॉलिवूडची ‘बार्बी गर्ल’, व्हिडिओ शेअर करत म्हणतेय…