Thursday, June 12, 2025
Home मराठी ‘तुझं हसणं तर हृदयाचा ठोकाच चुकवतं’, तेजश्री प्रधानचा गोड फोटोवर उमटतायेत चाहत्यांच्या प्रतिक्रिया

‘तुझं हसणं तर हृदयाचा ठोकाच चुकवतं’, तेजश्री प्रधानचा गोड फोटोवर उमटतायेत चाहत्यांच्या प्रतिक्रिया

मराठी चित्रपटसृष्टीतील अत्यंत सोज्वळ, सुंदर, निरागस आणि आपल्या अभिनयाच्या जोरावर आख्ख्या महाराष्ट्राला वेड लावणारी मराठमोळी अभिनेत्री म्हणजे तेजश्री प्रधान. अनेक मालिकांमधून तसेच चित्रपटातून ती घराघरात पोहचली आहे. उत्तम संवाद कौशल, योग्य टायमिंग, प्रत्येक भावना प्रेक्षकांपर्यंत पोहचवणे ही तेजश्रीची ओळख आहे. तेजश्री सोशल मीडियावर देखील मोठ्या प्रमाणात सक्रिय असते. अशातच तिने तिचा एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे.

अलीकडेच तिने सोशल मीडियावर शेअर केलेल्या फोटोमध्ये ती खूपच गोड दिसत आहे. या फोटोमध्ये तुम्ही पाहू शकता की, तेजश्रीने पांढऱ्या रंगाचा टी-शर्ट परिधान केला आहे. यासोबत तिने केसांना पांढऱ्या रंगाचा हेअर बेल्ट लावला आहे. तसेच लाल रंगाची लिपस्टिक लावली आहे. या फोटोमध्ये ती लहान मुलीप्रमाणे खूपच क्यूट दिसत आहे. (Marathi actress tejashri pradhan share her cute photo on social media)

हा फोटो शेअर करून तिने कॅप्शन दिले आहे की, “कारण मला माझ्या लिपस्टिकची शेड खूप आवडली.” तेजश्रीचा सोशल मीडियावर खूप मोठा चाहता वर्ग आहे. ते नेहमीच तिच्या प्रत्येक फोटोला भरभरून प्रतिसाद देत असतात. तिच्या या फोटोला देखील चाहते चांगला प्रतिसाद देत आहेत. तिच्या एका चाहत्याने या फोटोवर कमेंट केली आहे की, “वा काय छान आणि गोड दिसत आहेस. हसणं तर एकदम काळजाचा ठोका वाढवते आहे.” तसेच आणखी एकाने लिहिले आहे की, “चौदाहवी का चांद हो, या आफताब हो, जो भी हो तुम. खुदा की कसम लाजवाब हो.” यासोबत आणखी एका चाहत्याने कमेंट आहे की, “तेजस्वी आग, तेजस्वी अंदाज, तेजस्वी मुखडा आणि तेजस्वी तुकडा.”

तेजश्रीने अनेक मालिकांमध्ये काम केले आहे. पण तिची होणार ‘सून मी या घरची’ ही मालिका संपूर्ण महाराष्ट्रात खूप गाजली होती. या मालिकेतील तिच्या जान्हवी नावाच्या पात्राला खूप पसंती मिळाली होती. तसेच तिची ‘अगंबाई सासूबाई’ ही मालिका देखील खूप लोकप्रिय झाली होती. या मालिकेतील तिचे शुभ्रा नावाचे अत्यंत समंजस, विचारी आणि प्रॅक्टिकल पात्र प्रेक्षकांना खास पसंत पडले होते. याशिवाय तिने ‘लेक लाडकी या घरची’, ‘या गोजिरवाण्या घरात’ या मालिकांमध्ये काम केले आहे. तसेच तिने ‘ती सध्या काय करते’, ‘असेही एकदा व्हावे’, ‘लग्न पहावे करून’, ‘झेंडा’, ‘शर्यत’, ‘डॉक्टर प्रकाश बाबा आमटे’ यांसारख्या चित्रपटात काम केले आहे.

दैनिक बोंबाबोंचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

बॉलिवूडचे ‘हे’ मोठे सिनेमे ठरले नुसताच फुसका बार, कमाईतून बजेट वसूल करणे देखील झाले मुश्किल

बॉलिवूडच्या ‘या’ दिग्गज अभिनेत्रींनी लग्नानंतर त्यांच्या यशस्वी चित्रपटांच्या करिअरला ठोकला रामराम

प्रायव्हेट जेटमध्ये मांडी घालून बसलेल्या प्रियांका चोप्राचा फोटो व्हायरल, नेटकरी म्हणाले, ‘खरी देसी गर्ल’

हे देखील वाचा