‘होणार सून मी घरची’ या मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला एक सुंदर आणि सोज्वळ अशी अभिनेत्री आली होती. तिच्या अभिनयाची जादू एवढी आहे की, अजूनही त्या मालिकेतील तिचा अभिनय कोणताही प्रेक्षक विसरू शकला नाही. तिने महाराष्ट्रातील प्रत्येकाच्या मनावर राज्य केले आहे. ती अभिनेत्री म्हणजे सर्वांची लाडकी तेजश्री प्रधान होय. तेजश्रीने अनेक मालिका, चित्रपट आणि नाटकांमध्ये काम करून प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. तेजश्री सोशल मीडियावर देखील मोठ्या प्रमाणात सक्रिय असते. अशातच तिचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे.
तेजश्रीने अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवरून तिचे दोन फोटो शेअर केले आहेत. या फोटो शमध्ये ती नेहमीप्रमाणेच खूप सुंदर दिसत आहे. फोटोमध्ये आपण पाहू शकतो की, तिने पांढऱ्या रंगाची साडी नेसली आहे. यावर तिने गुलाबी रंगाचा स्लीव्हलेस ब्लाऊज घातला आहे. या फोटोमध्ये तिने कोणतीही ज्वेलरी घातली नाही तसेच अगदी हलकासा मेकअप केला आहे. तसेच सगळे केस मागे बांधले आहेत. (Marathi actress tejashri pradhan share her saree photos on social media)
तिच्या या फोटोवर अनेक चाहते त्यांच्या प्रतिक्रिया देत आहेत. तिच्या एका चाहत्याने या फोटोवर कमेंट केली आहे की, “खूपच सुंदर म्हणजे दुधात साखर.” आणखी एकाने “परमसुंदरी,” अशी कमेंट केली आहे. तिच्या चाहत्यांना हा लूक खूप आवडला आहे. तिच्या या फोटोवर एक लाखांपेक्षाही जास्त लाईक्स आले आहेत.
तेजश्रीने अनेक मालिकांमध्ये काम केले आहे. पण तिची होणार ‘सून मी या घरची’ ही मालिका संपूर्ण महाराष्ट्रात खूप गाजली होती. या मालिकेतील तिच्या जान्हवी नावाच्या पात्राला खूप पसंती मिळाली होती. तसेच तिची ‘अगंबाई सासूबाई’ ही मालिका देखील खूप लोकप्रिय झाली होती. या मालिकेतील तिचे शुभ्रा नावाचे अत्यंत समंजस, विचारी आणि प्रॅक्टिकल पात्र प्रेक्षकांना खास पसंत पडले होते. याशिवाय तिने ‘लेक लाडकी या घरची’, ‘या गोजिरवाण्या घरात’ या मालिकांमध्ये काम केले आहे. तसेच तिने ‘ती सध्या काय करते’, ‘असेही एकदा व्हावे’, ‘लग्न पहावे करून’, ‘झेंडा’, ‘शर्यत’, ‘डॉक्टर प्रकाश बाबा आमटे’ यांसारख्या चित्रपटात काम केले आहे.
दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-
-केशरी रंगाचे महत्व सांगत नवरात्रीच्या चौथ्या दिवशी अपूर्वा नेमळेकरचा जगदंबा अवतार
–अमिताभ यांच्यासोबत असणाऱ्या अफेयरच्या प्रश्नावर उत्तर देताना रेखा म्हणाल्या होत्या…
–आसामच्या फ्लोरिना गोगोईने पटकावले ‘सुपर डान्सर चॅप्टर ४’चे विजेतेपद