Tuesday, July 9, 2024

गुलाबी रंगाच्या ड्रेसमध्ये तेजश्री प्रधान दिसतेय खूपच क्यूट, लेटेस्ट फोटोला मिळतेय चाहत्यांची पसंती

मराठी चित्रपटसृष्टीतील अत्यंत सोज्वळ, सुंदर, निरागस आणि आपल्या अभिनयाच्या जोरावर आख्ख्या महाराष्ट्राला वेड लावणारी मराठमोळी अभिनेत्री म्हणजे तेजश्री प्रधान. अनेक मालिकांमधून तसेच चित्रपटातून ती घराघरात पोहचली आहे. उत्तम संवाद कौशल, योग्य टायमिंग, प्रत्येक भावना प्रेक्षकांपर्यंत पोहचवणे ही तेजश्रीची ओळख आहे. तेजश्री सोशल मीडियावर देखील मोठ्या प्रमाणात सक्रिय असते. अशातच तिने काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

तेजश्रीने तिच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवरून तिचे काही फोटो शेअर केले आहेत. या फोटोमध्ये ती खूपच क्यूट दिसत आहे. या फोटोमध्ये तुम्ही पाहू शकता कि, तिने गुलाबी रंगाचा ड्रेस घातला आहे. यासोबत तिने कानात मोठ्या रिंग्स घातल्या आहेत. या लूकमध्ये ती खूपच कूल आणि क्यूट दिसत आहे. तिचा हा फोटो तिच्या चाहत्यांसोबत अनेक कलाकरांना देखील आवडला आहे. अनेकजण सातत्याने या फोटोवर कमेंट करत आहेत. तसेच तिचे कौतुक करत आहे. तिच्या या फोटोवर भाग्यश्री लिमये, स्वाती चिटणीस, ऋतुजा बागवे, रोहन गुजर, नंदिता पाटकर या कलाकारांनी कमेंट केल्या आहेत. (marathi actress tejashri pradhan’s cute photos viral on social media)

तेजश्रीने अनेक मालिकांमध्ये काम केले आहे. पण तिची होणार ‘सून मी या घरची’ ही मालिका संपूर्ण महाराष्ट्रात खूप गाजली होती. या मालिकेतील तिच्या जान्हवी नावाच्या पात्राला खूप पसंती मिळाली होती. तसेच तिची ‘अगंबाई सासूबाई’ ही मालिका देखील खूप लोकप्रिय झाली होती. या मालिकेतील तिचे शुभ्रा नावाचे अत्यंत समंजस, विचारी आणि प्रॅक्टिकल पात्र प्रेक्षकांना खास पसंत पडले होते.

याशिवाय तिने ‘लेक लाडकी या घरची’, ‘या गोजिरवाण्या घरात’ या मालिकांमध्ये काम केले आहे. तसेच तिने ‘ती सध्या काय करते’, ‘असेही एकदा व्हावे’, ‘लग्न पहावे करून’, ‘झेंडा’, ‘शर्यत’, ‘डॉक्टर प्रकाश बाबा आमटे’ यांसारख्या चित्रपटात काम केले आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-‘ब्यूटी क्वीन’ डिंपल हयातीला रवी तेजाने दिले वाढदिवसाचे खास गिफ्ट; शेअर केला आगामी ‘खिलाडी’चा रोमॅंटिक पोस्टर

-खण स्कर्ट घालून रुपाली भोसलेने शेअर केले ‘हटके’ फोटोशूट, मात्र सर्वत्र रंगलीय ड्रेसची चर्चा

-‘ही’ व्यक्ती आहे अंकिता लोखंडेसाठी खूप खास; फोटो शेअर करत म्हणाली, ‘तू माझ्यासाठी…’

हे देखील वाचा