‘कलाकार काहीच करत नाही,’ असं म्हणणाऱ्यांना तेजस्विनी पंडितची इंस्टाग्राम पोस्ट करुन सणसणीत चपराक

Marathi actress tejaswini pandit donated her blood see photo


कोरोना कालावधीत लोकांच्या वेदना पाहून, सिनेसृष्टीतील कलाकार आपापल्यापरीने मदतीचा हात पुढे करत आहेत. नुकतेच मराठी सिनेसृष्टीतील एक अतिशय नामांकित आणि प्रसिद्ध अभिनेत्री तेजस्विनी पंडितनेही रक्तदान केले आहे. एक महत्वाचे कर्तव्य पार पाडून, तिने या संबंधित काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. जे पाहून सर्वजण अभिनेत्रीचे कौतुक करत आहेत.

तेजस्विनी पंडितने इंस्टाग्राम अकाऊंटवर शेअर केलेल्या एका फोटोंमध्ये ती रक्तदान करताना दिसत आहे. तर, दुसऱ्या फोटोमध्ये तिच्या हातात रक्तदान केल्याचे प्रमाणपत्र दिसत आहे. फोटो शेअर करत तिने अतिशय महत्वाचा संदेशही दिला आहे. कॅप्शनमध्ये अभिनेत्रीने लिहिले, “अभिमानाने आरशात बघता आलं पाहिजे, असं माझे बाबा म्हणतात.”

पुढे अभिनेत्रीने लिहिले, “समाजकल्याण करताना कॅमेरा घरी ठेवायचा, ही पण माझ्या बाबांची शिकवण. पण आजच्या डिजिटल युगात जाहीर करावं लागतं. कारण कलाकार कॅमेऱ्याच्या मागेही अभिनय करत असतो असं बहुतेकांना वाटतं, पण तसं नाहीये.” असे करून तिने सर्वांसमोर एक उत्तम उदाहरण ठेवले आहे. यासोबत, “जमेल तेव्हा जाहीर करून मदत करत राहील,” असेही तेजस्विनी म्हणाली.

नुकतेच ‘सैराट’ फेम आकाश ठोसरनेही रक्तदान केले आहे. ज्याचे फोटो सोशल मीडियावर शेअर करत, त्याने सर्वांना रक्तदान या प्लाझ्मा दान कारण्याचे आवाहन केले होते.

याशिवाय तेजस्विनी पंडित चित्रपट क्षेत्रातील एक मोठे नाव असण्याबरोबरच, सोशल मीडियावरीलही एक मोठा चेहरा आहे. बर्‍याचदा तिचे फोटो इंटरनेटवर धुमाकूळ घालत असतात. मराठमोळी अभिनेत्री सध्या रुपेरी पडद्यापासून दूर आहे, पण ती सोशल मीडिया पोस्टमुळे इंटरनेटवर नेहमी चर्चेत असते.


Leave A Reply

Your email address will not be published.