राज्यभरात चालू असणाऱ्या टाळेबंदीचा परिणाम आज प्रत्येकावर झाला आहे. अगदी सामान्य जनतेपासून ते चित्रपटातील अनेक कलाकारांवर याचा परिणाम झाला आहे. शारीरिक स्वास्थ्यासोबतच अनेकांचे मानसिक स्वास्थ देखील बिघडले आहे. कोणाची नोकरी गेल्यामुळे त्यांना एक वेळेचे जेवण मिळत नाही, तर कोणी घरात बसून डिप्रेशनमध्ये येत आहे. कोणाला त्यांच्या प्रेमींना भेटायला मिळत नाही म्हणून टेन्शन आहे, तर कोणी उद्या आपण जगू की मरू याबाबत शाश्वती नसल्याने चिंतेत आहे.
आज प्रत्येकजण ज्याच्या त्याच्या चिंतेत आहे. या काळात आयुष्याला नेमकी दिशा कशी द्यावी, हा प्रश्न सर्वांसमोर उभा ठाकला आहे. अशातच मराठी अभिनेत्री तेजस्विनी पंडित हिने एक भावुक पोस्ट केली आहे. ज्या पोस्टची सध्या सर्वत्र चर्चा सुरू आहे.
अभिनेत्री तेजस्विनी पंडितने एक मिम शेअर केले आहे. यामध्ये असे लिहिले आहे की, “आज खूप उदास होतो, मग विचार केला की मित्राला फोन करू. ५ मिनिटांनंतर फोन ठेवताना मलाच म्हणावे लागले, ‘टेन्शन नको घेऊ मित्रा, सर्व ठीक होईल.'”
तेजस्विनीची ही पोस्ट वाचून तिचे चाहते तिला कमेंट करून विचारपूस करत आहे, तर काहीजण तिला “ही वेळ पण निघून जाईल” असे सांगत आहेत. खरं तर आजकाल सगळ्यांची स्थिती अशीच झाली आहे. प्रत्येकाला आपापले दुःख आहे.
तेजस्विनीच्या कामाबद्दल बोलायचे झाल्यास, तिने ‘अगं बाई अरेच्चा’ या चित्रपटात खलनायिकेची भूमिका निभावली होती. त्यानंतर तिने ‘रखेली’ या नाटकात काम केले. तिला ‘मी सिंधुताई सपकाळ’ या चित्रपटातून लोकप्रियता मिळाली. तसेच तिने ‘तू ही रे’ या चित्रपटात काम करून सगळीकडे आपली ओळख निर्माण केली.
दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-
-कोरोना जाईना! ‘अप्सरा’ सोनाली कुलकर्णीला आठवतायत महामारीच्या पूर्वीचे दिवस, फोटो शेअर करत म्हणाली…
-‘सनी लिओनीचे व्हिडिओ पाठवू का?’ म्हणणाऱ्या युजरला अभिनेत्री राजेश्वरी खरातचे खडेबोल, म्हणाली…