Thursday, December 12, 2024
[aioseo_breadcrumbs]

‘तू माझी आवडती’, तेजस्विनी पंडितच्या क्यूट फोटोवर फॅन्ससोबतच कलाकारांच्या देखील उमटतायेत प्रतिक्रिया

आपल्या सालस आणि सोज्वळ सौंदर्याने प्रत्येकाच्या मनावर राज्य करणारी मराठमोळी अभिनेत्री तेजस्विनी पंडित. टीव्ही सीरिअल्समधून ती घराघरात पोहचली आणि प्रत्येक मराठी माणसाच्या मनात आपलं एक अढळ स्थान निर्माण केलं. ‘तुझं नी माझं घर श्रीमंताच’ स्टार प्रवाहवरील या लोकप्रिय मालिकेने तेजस्विनीला चांगलीच ओळख दिली. अनेक मराठी टीव्ही सीरिअल्स, चित्रपट आणि नाटकांमधून आपण तेजस्विनीला साध्या आणि सोज्वळ भूमिकेत पाहिले आहे. ती सोशल मीडियावर देखील मोठ्या प्रमाणात सक्रिय असते. तिचे वेगवेगळे फोटो शेअर करून ती नेहमीच चाहत्यांशी जोडून असते. अशातच तिने तिचे काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

तेजस्विनीने शेअर केलेल्या या फोटोमध्ये आपण पाहू शकतो की, ती बेडवर बसून वेगवेगळ्या पोझ देताना दिसत आहे. या फोटोमध्ये तिने लाल आणि काळया रंगाचा चेक्सचा शर्ट घातला आहे. तसेच डोक्यावर टोपी घातली आहे आणि पायात राखाडी रंगाचे मोजे घातले आहेत. या फोटोमध्ये ती खूपच क्यूट दिसत आहे. तिच्या बेडवर शेजारी एक पुस्तक दिसत आहे. या फोटोमध्ये ती फार आकर्षक दिसत आहे.

हे फोटो शेअर करून तिने “आवडता” असे कॅप्शन दिले आहे. तिच्या या फोटोवर तिचे अनेक चाहते कमेंट करत आहेत. अनेकांना तिचा हा लूक खूप आवडला आहे. तिच्या या फोटोवर भाग्यश्री लिमये हिने “तू माझी आवडती आहेस.” अशी कमेंट केली आहे. तसेच इतर चाहते देखील या फोटोवर कमेंट करत आहेत. तिचा हा लूक सर्वांना खूप आवडला आहे. (marathi actress tejaswini pandit share her cute photo on social media)

तेजस्विनीच्या कामाबद्दल बोलायचे झाल्यास, तिने ‘अगं बाई अरेच्चा’ या चित्रपटात खलनायकाची भूमिका निभावली होती. त्यानंतर तिने ‘रखेली’ या नाटकात काम केले.तिला ‘मी सिंधुताई सपकाळ’ या चित्रपटातून खूप ओळख आणि लोकप्रियता मिळाली. तसेच तिने ‘तू ही रे’ या चित्रपटात काम करून सगळीकडे आपली ओळख निर्माण केली. यासोबत तिने ‘येरे येरे पैसा’, ‘देवा’, ‘एक तारा’ या चित्रपटात काम केले आहे.

 

दैनिक बोंबाबोंचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-उफ्फ ब्यूटी! तेजस्विनीच्या स्टायलिश लूकने इंटरनेटवर लावली आग, बेडवर बसून देतेय फोटोसाठी पोझ

-शाहरुख खान पुन्हा एकदा दिसणार ‘डबल रोल’मध्ये? जाणून घ्या काय आहे आगामी चित्रपटाची कथा

-उर्वशी रौतेलालाही मिळाला दुबईचा गोल्डन व्हिसा, फोटो शेअर करत व्यक्त केला आनंद

हे देखील वाचा