तेजस्विनी पंडित मराठी सिनेसृष्टीतील एक अतिशय नामांकित आणि प्रसिद्ध अभिनेत्री आहे. करमणूक उद्योगातील एक मोठे नाव असण्याबरोबरच, ही अभिनेत्री सोशल मीडियावरही खूप सक्रिय असते आणि बर्याचदा तिचे फोटो इंटरनेटवर धुमाकूळ घालत असतात. मराठमोळी अभिनेत्री सध्या रुपेरी पडद्यापासून दूर आहे, पण ती सोशल मीडिया पोस्टमुळे इंटरनेटवर नेहमी चर्चेत असते. तिच्या चाहत्यांचे मनोरंजन करण्यासाठी ती सतत फोटो आणि व्हिडिओ शेअर करत राहते. तिच्या या पोस्ट्सला चाहत्यांकडूनही खूप प्रेम मिळते. त्यामुळे तिचे फोटो बरेच व्हायरल होत असतात.
तेजस्विनीचा असाच एक फोटो आजकाल इंटरनेटवर धुमाकूळ घालतोय. या फोटोमध्ये अभिनेत्रीच्या चेहऱ्यावरचा निरागसपणा पाहायला मिळत आहे. आपण पाहू शकतो की, यात तिने डोक्यावर एक टोपी घातलेली आहे. तिच्या चाहत्यांना हा फोटो खूपच आवडल्याचे दिसून येत आहे.
खरं तर हा फोटो, तेजस्विनीने स्वतः तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवरून पोस्ट केला आहे. ज्याला आतापर्यंत 35 हजाराहून अधिक युजर्सने लाईक केले आहे. तसेच, कमेंट बॉक्समध्ये प्रतिक्रिया देत, चाहत्यांनी भरभरून प्रेम व्यक्त केले आहे. फोटो शेअर करत तेजस्विनीने कॅप्शनमध्ये लिहिले की, “जिंदगी जब भी मुझे लगा मैने तुझे पढ लिया है, तुने एक पन्ना और खोल दिया…” फोटोसोबतच कॅप्शननेही चाहत्यांची मने जिंकली आहेत.
तेजस्विनीच्या कारकिर्दीबद्दल बोलायचे झाले, तर तिने केदार शिंदे दिग्दर्शित, ‘अग्गं बाई अरेच्चा’ मध्ये नकारात्मक भूमिका साकारून तिच्या कारकिर्दीची सुरुवात केली होती. एका वास्तविक कथेवर आधारित, ‘मी सिंधुताई सपकाळ’ या चित्रपटात ती मुख्य भूमिका साकारताना दिसली. या चित्रपटाने तिला बरीच ओळख मिळवून दिली. यातील तिच्या अभिनयाचे खूप कौतुक झाले. तिने फक्त चित्रपटातच नव्हे, तर टीव्ही शो आणि नाटकांमध्येही काम केले आहे. तेजस्विनी अखेरच्या वेळेस संजय जाधव दिग्दर्शित ‘ये रे ये रे पैसा’ मध्ये दिसली होती. या चित्रपटात तिच्यासोबत उमेश कामत आणि सिध्दार्थ जाधव मुख्य भूमिकेत दिसले होते.