आपल्या सालस आणि सोज्वळ सौंदर्याने प्रत्येकाच्या मनावर राज्य करणारी मराठमोळी अभिनेत्री म्हणजे तेजस्विनी पंडित. टीव्ही मालिकांमधून ती घराघरात पोहचली आणि प्रत्येक मराठी माणसाच्या मनात आपलं एक अढळ स्थान निर्माण केले. ‘तुझं नी माझं घर श्रीमंताचं’ स्टार प्रवाहवरील या लोकप्रिय मालिकेने तेजस्विनीला चांगलीच ओळख दिली.
अनेक मराठी टीव्ही मालिका, चित्रपट आणि नाटकांमधून आपण तेजस्विनीला साध्या आणि सोज्वळ भूमिकेत पाहिले आहे. पण तिचा कूल डॅशिंग लूक कसा असेल याचा कोणी विचार तरी केला आहे का? तेजस्विनीने तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून काही डॅशिंग फोटो शेअर केले आहेत. जे पाहून तिच्या चाहत्यांचे अक्षरशः डोळे फिरले आहेत. (marathi actress tejaswini pandit’s cool dashing look viral on social media)
तेजस्विनीने तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून काही डॅशिंग फोटो शेअर केले आहेत. या फोटोमध्ये तुम्ही पाहू शकता की, तिने फिकट केशरी रंगाचा ट्रकसूट परिधान केला आहे. सोबतच तिने गुलाबी रंगाचे बूट घातले आहेत. तसेच रंगीबेरंगी टोपी अगदी स्टाईलमध्ये घातली आहे. या फोटोमध्ये तिने अत्यंत कूल पोझ दिल्या आहेत. हा फोटो शेअर करून तिने लिहिले आहे की, “जर तुम्ही मला एकदा दाखवले की, मी तुमच्यासाठी एक पर्याय आहे, तर मी देखील तुम्हाला दाखवेल माझ्याकडे किती पर्याय आहेत.”
तिचा हा लूक तिच्या चाहत्यांना खूप आवडला आहे, तसेच सगळेजण या फोटोवर कमेंट करून तिचे कौतुक करत आहे. अनेक कलाकारांना देखील तिचा हा लूक आवडला आहे. अनेकजण तिच्या या फोटोवर कमेंट करत आहेत. तिच्या या पोस्टवर स्वप्नील जोशी, पियुष रानडे, सिद्धार्थ जाधव, ऋतुजा बागवे, गायत्री दातार , गौरी नलावडे यांनी कमेंट केल्या आहेत. पियुष रानडेने यावर कमेंट केली आहे की, “श्रीखंड गोळी आठवली तुला बघून.” तर सिद्धार्थ जाधवने कमेंट केली आहे की, “बंड्या आता काय ऐकून घेत नाही बाबा.”
तेजस्विनीच्या कामाबद्दल बोलायचे झाल्यास, तिने ‘अगं बाई अरेच्चा’ या चित्रपटात खलनायिकाची भूमिका निभावली होती. त्यानंतर तिने ‘रखेली’ या नाटकात काम केले. तिला ‘मी सिंधुताई सपकाळ’ या चित्रपटातून खूप ओळख आणि लोकप्रियता मिळाली. तसेच तिने ‘तू ही रे’ या चित्रपटात काम करून सगळीकडे आपली ओळख निर्माण केली.
दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-
-अथिया शेट्टीच्या पोस्टवर अनुष्काने ‘त्या’ गोष्टीवर निशाणा साधत केली भन्नाट कमेंट
-शिवानी सोनारला वाढदिवसाच्या आधीच मिळाले ‘हे’ गिफ्ट, पाहून तुम्हीही कराल अभिनंदन