Friday, December 13, 2024
[aioseo_breadcrumbs]

‘लय भारी’ तेजस्विनीच्या मराठमोळ्या सौंदर्याची सर्वांनाच भुरळ, पदरावरील ‘त्या’ श्लोकाने वेधले खास लक्ष

तेजस्विनी पंडित मराठी सिनेसृष्टीतील एक अतिशय नामांकित आणि प्रसिद्ध अभिनेत्री आहे. मनोरंजन क्षेत्रातील एक मोठे नाव असण्याबरोबरच, ही अभिनेत्री सोशल मीडियावरही खूप सक्रिय असते. बर्‍याचदा तिचे फोटो आणि व्हिडिओ इंटरनेटवर धुमाकूळ घालत असतात. ही मराठमोळी अभिनेत्री तिच्या सोशल मीडिया पोस्टमुळे बऱ्याचदा चर्चेत येत असते. तिच्या चाहत्यांचे मनोरंजन करण्यासाठी ती सतत फोटो आणि व्हिडिओ शेअर करत राहते. तिच्या या पोस्ट्सला चाहत्यांकडूनही खूप प्रेम मिळते. त्यामुळे तिचे फोटो बरेच व्हायरल होत असतात. अशातच तिचा एक सुंदर फोटो समोर आला आहे.

तेजस्विनीने अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवरून तिचा एक फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये तुम्ही पाहू शकता की, तिने हिरव्या रंगाची खण पैठणी नेसली असून, त्यावर तिने पांढऱ्या रंगाचा ब्लाऊज घातलेला आहे. तर हातात हिरव्या रंगाचा चुडा, कानात मोठे झुमके, नाकात नथ, कपाळी चंद्रकोर, केसात गजरा असा अगदी मराठमोळा साजशृंगार केला आहे. तिच्या साडीच्या पदरावर ‘यदा यदा ही धर्मस्य ग्लानिर्भवती भारतः…’ हा महाभारतातील श्लोक लिहिला आहे. तेजस्विनीच्या या लुकसोबतच तिच्या पदरावरील श्लोकाने सर्वांचेच लक्ष वेधून घेतले आहे. (Marathi actress Tejaswini pandit’s new saree photos viral on social media)

तेजस्विनीचा हा लूक तिच्या चाहत्यांना नेहमीप्रमाणेच खूप आवडला आहे. अनेकजण या फोटोवर कमेंट करून तिचे कौतुक करत आहेत. अशातच तेजस्विनीचा खास मित्र आणि अभिनेता सिद्धार्थ जाधव याने या फोटोवर हार्ट ईमोजी पोस्ट केल्या आहेत. तिच्या एका चाहत्याने या फोटोवर “लय भारी” अशी कमेंट केली आहे. तसेच काहींना तिची साडी खूप आवडली आहे.

तेजस्विनीच्या कामाबद्दल बोलायचे झाल्यास, तिने ‘अगं बाई अरेच्चा’ या चित्रपटात खलनायिकाची भूमिका निभावली होती. त्यानंतर तिने ‘रखेली’ या नाटकात काम केले. तिला ‘मी सिंधुताई सपकाळ’ या चित्रपटातून खूप ओळख आणि लोकप्रियता मिळाली. तसेच तिने ‘तू ही रे’ या चित्रपटात काम करून सगळीकडे आपली ओळख निर्माण केली. या चित्रपटात तिच्यासोबत सई ताम्हणकर आणि स्वप्निल जोशी हे होते.

 

दैनिक बोंबाबोंचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-‘कू’ ऍपवरही कंगना रणौत गाजवतेय वर्चस्व; काही दिवसांतच मिळवले तब्बल ‘इतके’ फॉलोव्हर्स

-‘हा निव्वळ पब्लिसिटी स्टंट’, म्हणत मनोज पाटील आत्महत्या प्रकरणावर साहिल खानने सोडले मौन

-शूटिंग सोडून तुर्कीमध्ये ‘हे’ काम करताना दिसली बॉलिवूडची ‘बार्बी गर्ल’, व्हिडिओ शेअर करत म्हणतेय…

हे देखील वाचा