Friday, March 6, 2026
Home मराठी ‘लहानपणी मला परी बनण्याची इच्छा होती आणि…’, म्हणत तेजश्री प्रधान बनली ग्लॅमरस परी!

‘लहानपणी मला परी बनण्याची इच्छा होती आणि…’, म्हणत तेजश्री प्रधान बनली ग्लॅमरस परी!

मराठी चित्रपटसृष्टीतील अत्यंत सोज्वळ, सुंदर, निरागस आणि आपल्या अभिनयाच्या जोरावर आख्ख्या महाराष्ट्राला वेड लावणारी मराठमोळी अभिनेत्री म्हणजे तेजश्री प्रधान होय. अनेक मालिकांमधून तसेच चित्रपटातून ती घराघरात पोहचली आहे. उत्तम संवाद कौशल, योग्य टायमिंग, प्रत्येक भावना प्रेक्षकांपर्यंत पोहचवणे ही तेजश्रीची ओळख आहे. ऑनस्क्रीन प्रमाणेच ऑफस्क्रीन देखील तेजश्री एक प्रेमळ व्यक्तिमत्व आहे. तेजश्री स्टाईलच्या बाबतीत देखील खूप वरचढ आहे. अशातच तिने सोशल मीडियावर अत्यंत ग्लॅमरस फोटो शेअर केला आहे.

तेजश्रीने तिच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवरून काही फोटो शेअर केले आहेत. या फोटोमध्ये ती खूप सुंदर दिसत आहे. तिने फिकट गुलाबी रंगाचा एक शॉर्ट ड्रेस परिधान केला आहे. या ऑफ शोल्डर ड्रेसमध्ये तर ती खूपच सुंदर दिसत आहे. यामध्ये तिने तिचे सगळे केस मोकले सोडले आहे. ती यामध्ये वेगवेगळ्या पोझ देत आहे. एकंदरीतच ती या पोस्टमध्ये खूपच सुंदर दिसत आहे.

हा फोटो शेअर करून तिने लिहिले आहे की, “मला लहान असताना नेहमी परी बनण्याची इच्छा होती आणि मग एक दिवस देव म्हणाला की, मी तुला अशा करिअरमध्ये टाकतो जिथे तू तुझ्या सर्व परीकथा जगू शकतेस.” तिचे हे फोटो सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहेत. तसेच तिचे अनेक चाहते या फोटोवर कमेंट करून तिचे कौतुक करत आहेत.(marathi actress tejshri pradhan’s glamrous photos viral on social media )

तेजश्रीने अनेक मालिकांमध्ये काम केले आहे. पण तिची होणार ‘सून मी या घरची’ ही मालिका संपूर्ण महाराष्ट्रात खूप गाजली होती. या मालिकेतील तिच्या जान्हवी नावाच्या पात्राला खूप पसंती मिळाली होती. तसेच तिची ‘अग्गबाई सासूबाई’ ही मालिका देखील खूप लोकप्रिय झाली होती. या मालिकेतील तिचे शुभ्रा नावाचे अत्यंत समंजस, विचारी आणि प्रॅक्टिकल पात्र प्रेक्षकांना खास पसंत पडले होते. याशिवाय तिने ‘लेक लाडकी या घरची’, ‘या गोजिरवाण्या घरात’ या मालिकांमध्ये काम केले आहे. तसेच तिने ‘ती सध्या काय करते’, ‘असेही एकदा व्हावे’, ‘लग्न पहावे करून’, ‘झेंडा’, ‘शर्यत’, ‘डॉक्टर प्रकाश बाबा आमटे’ यांसारख्या चित्रपटात काम केले आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-आता होणार धमाल! प्रेक्षकांचे मनोरंजन करायला ‘या’ पाच मालिका सज्ज; लवकरच झी मराठीवर मारणार दणक्यात एंट्री

-अथिया शेट्टीच्या पोस्टवर अनुष्काने ‘त्या’ गोष्टीवर निशाणा साधत केली भन्नाट कमेंट

-शिवानी सोनारला वाढदिवसाच्या आधीच मिळाले ‘हे’ गिफ्ट, पाहून तुम्हीही कराल अभिनंदन

हे देखील वाचा