सौंदर्य आणि अभिनय यांच्या सुंदर मिलापाचे उत्तम उदाहरण म्हणजे अभिनेत्री तेजस्विनी पंडित. तेजस्विनीने तिच्या अभिनयाच्या जोरावर मराठी चित्रपटसृष्टीमध्ये स्वतःचे स्थान निर्माण केले. ‘तुझं नी माझं घर श्रीमंताचं’ स्टार प्रवाहवरील या लोकप्रिय मालिकेने तेजस्विनीला चांगलीच ओळख दिली. अनेक मराठी टीव्ही सीरिअल्स, चित्रपट आणि नाटकामधून आपण तेजस्विनीला साध्या आणि सोज्वळ भूमिकेत पाहिले आहे. आजकाल तेजस्विनी सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात सक्रिय असते. तिचे नवीन फोटो तसेच व्हिडिओ ती सोशल मीडियावर शेअर करत असते. अशातच तिचे काही सुंदर फोटो तिने शेअर केले आहेत.
तेजस्विनीने अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवरून तिचे काही साडीमधील फोटो शेअर केले आहेत. या फोटोमध्ये आपण पाहू शकतो की, तेजस्विनी अगदी सुंदर आणि सोज्वळ दिसत आहे. तिने मरून कलरची साडी नेसलेली आहे. यावर तिने गुलाबी रंगाचा एक सुंदर ब्लाउज घातला आहे. या ब्लाउजवर ‘श्री’ असे लिहिलेले दिसत आहे. तिने कानात मोठे झुमके घातलेले दिसत आहेत. तसेच मिडल पार्टेशन करून केस मागे बांधले आहेत. यासोबत तिने कपाळी टिकली लावली आहे. तसेच हातात साडी आणि ब्लाउजला मॅचिंग अशा बांगड्या घातलेल्या दिसत आहेत. तसेच दुसऱ्या एका फोटोमध्ये तिने गुलाबी रंगाची एक पर्स घेतलेली आहे. त्या पर्सवर देखील काहीतरी लिहिलेले दिसत आहे. (marathi actress tejswini pandit’s traditional look viral on social media)
तेजस्विनीने हे फोटो शेअर करून अत्यंत सुंदर कॅप्शन दिले आहे. तिने लिहिले आहे की, “कोणीही कितीही आधुनिक कपड्यात सुंदर दिसण्याचा प्रयत्न करा. पण साडीचं सौंदर्य काही औरच! त्यातून स्वतः डिझाईन केलेली साडी असेल तर ती नेसणे होते आणखी खास! मनात कधीही फॅशनबद्दल शंका असेल तर साडी नेसा.” तिच्या या फोटोवर अनेकांच्या प्रतिक्रिया उमटत आहेत. तिच्या या फोटोवर अनेक कलाकार देखील कमेंट करत आहेत. या फोटोवर श्वेता महाडिक, ऋतुजा बागवे अभिज्ञा भावे यांनी कमेंट केल्या आहेत.
तेजस्विनीच्या कामाबद्दल बोलायचे झाल्यास, तिने ‘अगं बाई अरेच्चा’ या चित्रपटात खलनायिकेची भूमिका निभावली होती. त्यानंतर तिने ‘रखेली’ या नाटकात काम केले. तिला ‘मी सिंधुताई सपकाळ’ या चित्रपटातून खूप ओळख आणि लोकप्रियता मिळाली. तसेच तिने ‘तू ही रे’ या चित्रपटात काम आहे. या चित्रपटात तिने स्वप्नील जोशी आणि सई ताम्हणकर यांच्यासोबत काम केले आहे.
दैनिक बोंबाबोंचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-
-कैसे भुलू तुझे! सिद्धार्थच्या निधनाने अजून ही धक्क्यात आहे आसीम; सतत पाहतोय दोघांचे व्हिडिओ
-सायरा बानूंची आयसीयूमधून झाली मुक्तता; डिप्रेशन अन् ऍंजिओग्राफीबद्दल खुलासा करत डॉक्टर म्हणाले…










