मराठी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री जिने तीच्या डान्ससोबत अभिनयाने आणि सौंदर्याने भुरळ घातली आहे, ती म्हणजे अभिनेत्री उर्मिला कोठारे. उर्मिला कोठारे ही मराठी इंडस्ट्रीमधील सर्वात जास्त फिट अभिनेत्रींपैकी एक आहे. तिच्या दैनंदिन आयुष्यासोबत तसेच शूटिंगसोबत तिच्या फिटनेसचीही तेवढीच काळजी घेत असते. ती तिच्या कुटुंबासोबत अनेकवेळा फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते. तसेच तिचे देखील अनेक फोटो ती सोशल मीडियावर शेअर करत असते. अशातच तिने तिचे काही फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे.
उर्मिलाने तिच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवरून तिचे काही फोटो शेअर केले आहेत. या फोटोमध्ये ती नेहमीप्रमाणेच खूप सुंदर दिसत आहे. यामध्ये तुम्ही पाहू शकता की, तिने गुलाबी रंगाचा एक सुंदर ड्रेस परिधान केला आहे. यासोबत तिने हाय हिल्स घातले आहेत. या फोटोमध्ये ती खूपच सुंदर दिसत आहे. तसेच तिच्या काळ्याभोर कुरळ्या केसांनी तिच्या या सौंदर्यात आणखीनच भर पाडली आहे.
हा फोटो शेअर करून तिने लिहिले आहे की, “गुलाबी हा लोकप्रिय रंग का आहे?” तिच्या या फोटोवर तिचे चाहते सातत्याने कमेंट करून तिचे कौतुक करताना दिसत आहे. एका चाहत्याने कमेंट केली आहे की, “तू गुलाबी रंग घातलाय म्हणून तो लोकप्रिय आहे.” तिचा हा फोटो सर्वत्र व्हायरल होत आहे.
उर्मिलाने अनेक मराठी मालिकांमध्ये तसेच चित्रपटात काम केले आहे. तिने ‘गुरु’, ‘दुनियादारी’, ‘प्यारवाली लव्ह स्टोरी’, ‘दुभंग’, ‘मला आई व्हायचंय’, ‘शुभमंगल सावधान’, ‘टाईमपास’, ‘करार’, ‘ती सध्या काय करते’ यासारख्या चित्रपटात काम केले आहे. या चित्रपटातील तिची प्रत्येक भूमिका प्रेक्षकांना खूप आवडली आहे.
दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-
-इंडियन आयडलच्या ‘या’ स्पर्धकाचे फळफळले नशीब, करण जोहरकडून मिळाली थेट ‘धर्मा’साठी गाणी गाण्याची संधी
-अफेअरच्या चर्चांमध्ये सिद्धार्थ मल्होत्राने कियाराला रस्त्यावरच घेतले उचलुन, पुढे जे झाले…