Friday, April 25, 2025
Home मराठी उर्मिलाने मुलगी जिजासोबत तयार केली गणेशाची आकर्षक मूर्ती, व्हिडिओवर खिळल्या नेटकऱ्यांच्या नजरा

उर्मिलाने मुलगी जिजासोबत तयार केली गणेशाची आकर्षक मूर्ती, व्हिडिओवर खिळल्या नेटकऱ्यांच्या नजरा

मराठी चित्रपटसृष्टीतील एक उत्तम अभिनेत्री आणि डान्सर उर्मिला कोठारे ही सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात सक्रिय असते. अनेकवेळा ती तिचे अनेक फोटो आणि व्हिडिओ शेअर करत असते. तसेच तिच्या फॅमिलीसोबत देखील ती फोटो शेअर करत असते. अशातच उर्मिलाने तिची लेक जिजासोबत एक सुंदर व्हिडिओ शेअर केला आहे.

उर्मिलाने अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवरून जिजासोबत एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये या मायलेकी गणपतीची मूर्ती बनवताना दिसत आहे. या व्हिडिओमध्ये त्या दोघीही खूप गोड दिसत आहेत. मूर्ती बनवताना दोघींची मस्ती पाहायला मिळत आहे. या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, दोघींनीही हेअरबेल्ट लावले आहेत. ज्यात त्या दोघीही खूप क्यूट दिसत आहे. तसेच शेवटी जिजासोबत गणपतीचा फोटो पाहायला मिळत आहे. त्यांचा हा व्हिडिओ जोरदार व्हायरल होत आहे. (Marathi actress urmila kothare a share a video with her daughter jija)

उर्मिला आणि जिजाचा हा व्हिडिओ तिच्या चाहत्यांना तसेच कलाकारांना देखील खूप आवडला आहे. अनेकजण या व्हिडिओवर त्यांच्या प्रतिक्रिया देत आहेत. या व्हिडिओवर अभिनेता जितेंद्र जोशी याने कमेंट केली आहे की, “आदीला तुझे केस देऊन कोठारेंचे गाल दिले तर काय होईल=जिजा” सोनाली खरेने “सो क्यूट” तर आदिनाथ कोठारेने याने हार्ट ईमोजी पोस्ट केला आहे. यासोबतच तिचे अनेक चाहते देखील या व्हिडिओवर त्यांच्या प्रतिक्रिया देत आहेत.

अभिनेत्री उर्मिला कोठारेने अनेक मराठी चित्रपट, मालिकांमध्ये तसेच हिंदी मालिकांमध्ये देखील काम केले आहे. तिने मराठीमध्ये ‘दुनियादारी’, ‘शुभमंगल सावधान’, ‘ती सध्या काय करते’, ‘गुरू’, ‘काकण’, ‘प्यारवाली लव्ह स्टोरी’ यांसारख्या चित्रपटात काम केले आहे. तसेच तिने ‘मायका’ आणि ‘मेरा ससुराल’ या हिंदी मालिकांमध्ये सुद्धा काम केले आहे. उर्मिलाचे लग्न मराठीत चित्रपटसृष्टीतील दिग्गज निर्माते आणि अभिनेते महेश कोठारे यांचा मुलगा असणाऱ्या अभिनेता आदिनाथ कोठारेसोबत झाले आहे. आदिनाथ देखील एक कमालीचा अभिनेता आहे. उर्मिला आणि आदिनाथने ‘दुभंग’, ‘अनवट’ या चित्रपटात एकत्र काम केले आहे.

 

दैनिक बोंबाबोंचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-‘लय भारी’ तेजस्विनीच्या मराठमोळ्या सौंदर्याची सर्वांनाच भुरळ, पदरावरील ‘त्या’ श्लोकाने वेधले खास लक्ष

-‘दिसला गं बाई दिसला’, म्हणणाऱ्या ‘राजा राणीची गं जोडी’ फेम संजूचा गावरान अवतार भावला नेटकऱ्यांना

-सूरज पांचोलीला दिलासा, जिया खान आत्महत्या प्रकरणी सीबीआयची याचिका विशेष न्यायालयाने फेटाळली

हे देखील वाचा