या वर्षी सिनेसृष्टीतील अनेक कलाकार आई-बाबा झाले आहेत. यातीलच मराठमोळी अभिनेत्री उर्मिला निंबाळकर ही देखील आई झाली आहे. तिने या वर्षी ऑगस्ट महिन्यात एका गोंडस मुलाला जन्म दिला आहे. या गोष्टीची माहिती तिने सोशल मीडियावर तिच्या चाहत्यांना दिली होती. अशातच उर्मिलाने पहिल्यांदा तिच्या मुलासोबतचे फोटो केले शेअर आहेत.
उर्मिलाने अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवरून तिच्या बाळासोबत काही फोटो शेअर केले आहेत. या फोटोमध्ये तुम्ही पाहू शकता की, उर्मिलाने पांढऱ्या रंगाचा ड्रेस घातला असून, कानात मोठे ईअरिंग घातले आहेत. मिडल पार्टेशन करून केसाचा अंबाडा घालत केसांमध्ये गजरा माळला आहे. तसेच तिने एका कापडात बाळाला गुंडाळून हातात घेतले आहे. या फोटोमध्ये तिच्या बाळाचा चेहरा दिसत नाहीये. ( Marathi actress urmila Nimbalkar share first time her son’s photo on social media)
हे फोटो शेअर करून तिने लिहिले आहे की, “उर्मिला आणि एक गोंडस बाळ. बाळा बरोबरचा पहिला फोटो. मला कधी कधी विश्वासच बसत नाही, गुंडाळलेली अळी हा एक बरिटो माझा आहे.” तिचा हा सुंदर फोटो तिच्या चाहत्यांना खूप आवडला आहे. अनेकजण कमेंट करून तिच्या बाळाला आशीर्वाद देत आहेत. तसेच तिला शुभेच्छा देत आहे.”
उर्मिलाच्या कामाबद्दल बोलायचे झाल्यास, तिने अनेक मालिकांमध्ये काम केले आहे. तिने ‘दुहेरी’, ‘एक तारा’, ‘दिया और बाती हम’ या मालिकांमध्ये काम केले आहे. उर्मिला प्रेग्नेंट होती तेव्हा अनेक व्हिडिओ आणि फोटो शेअर केले होते. तसेच तिने डोहाळ जेवणाचे अनेक फोटो देखील शेअर केले होते. सोशल मीडियावर देखील ती मोठ्या प्रमाणात सक्रिय असते.
दैनिक बोंबाबोंचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-
-मलायका अरोराला आवडतो ‘अशा’प्रकारचा व्यक्ती, मिलिंद सोमणपुढे केला खुलासा
-निधन झाले गायिकेचे, पण सपना चौधरीलाच ठरवले मृत; अफवेने उडाली होती कुटुंबीयांची झोप
-ज्येष्ठ अभिनेते दिलीप कुमार यांचे ट्विटर अकाऊंट कायमचे बंद, ‘ही’ आहे शेवटची पोस्ट










