Thursday, January 22, 2026
Home मराठी मिझोरम हिंसाचारात उर्मिला निंबाळकरचे भाऊ झाले जखमी; मदतीसाठी सर्वांचे आभार मानत अभिनेत्रीने शेअर केली पोस्ट

मिझोरम हिंसाचारात उर्मिला निंबाळकरचे भाऊ झाले जखमी; मदतीसाठी सर्वांचे आभार मानत अभिनेत्रीने शेअर केली पोस्ट

मागच्या वर्षांपासून आसाममधखील बराक घाटी परिसरातील कचार, करीमगंज आणि हाईलकांडीची १६४ किलोमीटरची सीमा मिझोरम राज्यातील आईजोल, कोलासीब आणि मामित जिल्ह्यांना लागते. जमिनीच्या कारणावरुन ऑगस्ट २०२० पासून आंतरराज्य सीमेवर संघर्ष सुरु आहे. हा वाद काही दिवसांपूर्वी इतका पराकोटीला गेला की, मिझोरमच्या सीमेलगत असणाऱ्या लायलापूर भागात आसाम पोलीस विभागात काम करणारे ५ पोलीस शहीद झाले. यामध्ये कचर जिल्ह्याचे पोलीस अधिक्षक वैभव निंबाळकर जखमी झाले आहेत.

वैभव निंबाळकर हे अभिनेत्री उर्मिला निंबाळकर यांचे बंधू आहेत. वैभव यांना आसाममध्ये गोळी लागली आणि ते जखमी झाले. वैभव यांना गोळी लागून ते जखमी झाले आहेत, हे समजताच संपूर्ण कुटुंबाला मोठा धक्का बसला. आता वैभव यांच्या प्रकृतीमध्ये सुधारणा होत आहे. या संपूर्ण घटनेमुळे घरात कसे वातावरण झाले होते आणि आता कसे आहे, याबद्दल उर्मिलाने तिच्या इंस्टग्राम अकाऊंटवरून एक पोस्ट शेअर केली आहे. त्यात तिने लिहिले आहे, “सगळे उत्तम चालू असताना सकारात्मक राहणे, प्रार्थना म्हणणे वेगळे आणि ‘वैभवला गोळी लागलीय’ हे वाक्य ऐकायला मिळाल्यानंतर, ‘सगळं नीट होणार’ हा विचार मनात येणं वेगळं! काय झालं, कुठुन झालं, कोणत्या मशिन गननं झालं सगळं दिड दिवसांत एवढ्यावेळा कानावर आलंय पण खरं सांगु, मला आणि माझ्या घरच्यांना फक्त तो सुखरुप असावा, एवढीच आशा लागून राहिली होती. त्यात माझे प्रेग्नन्सीचे ९ महिने पु्र्ण झाल्यामुळे आता कधीही हॅास्पिटल गाठावं लागणार असल्यामुळे, मला ही बातमी सगळ्यात शेवटी सांगण्यात आली.”

पुढे तिने लिहीले की, “बाळांनाही आपण पॅनिक झालेलो कळतो आणि तेही मग पॅनिक होतात. सगळीकडे बातमी वाऱ्यासारखी पसरली. संपूर्ण विश्वासाने आम्ही भरपूर प्रार्थना म्हणालो. यशस्वी शस्त्रक्रिया पार पडून आयपीएस जवान वैभव आता अगदी सुखरुप आहे. किती आणि कुणाकुणाची कृतज्ञता व्यक्त करु? माझा भाऊ वैभवला आसाम-मिझोराम सिमेवर गोळी लागल्यानंतर, त्याची सुखरुप सर्जरी होऊन त्याला आराम लाभेपर्यंत पावलो पावली सद्गुरु रुपात अनेक माणसे मदतीसाठी धावली! एअर फोर्सच्या स्पेशल एअर ॲम्ब्युलन्सने त्याला मुंबईला आणण्यापासून ते, आसाम पोलिस, आसाम सरकार, मुंबई पोलिस, महाराष्ट्र सरकार, कोकिलाबेन अंबानी हॅास्पिटलचा संपुर्ण स्टाफ, डॅाक्टारांची फौज, आयपीएस वैभवचे सगळे अधिकारी-मित्र-बॅचमेटस्, वरिष्ठ अधिकारी, नामधारक, त्याच्या तब्ब्येतीसाठी प्रार्थना म्हणणारे तुम्ही सर्व..या संपुर्ण प्रक्रियेत माहित असलेले आणि नसलेले कित्तीतरी मदतीचे हात धावून आले. म्हणूनच मी आणि माझं संपुर्ण कुटुंब तुमचे आयुष्यभराचे ऋणी आहोत.” असे उर्मिला निंबाळकरने आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे. (marathi actress brother injured assam mizoram border attack)

उर्मिलानंतर वैभव यांच्या पत्नी अनुजा यांनी देखील सोशल मीडियावरून वैभव यांच्या तब्येतीची माहिती दिली आहे. त्यांनी त्यांच्या पोस्टमध्ये या कठीण काळात आपल्या मदतीला धावून आलेल्या प्रत्येकाचे आभार मानले आहेत.

वैभव हे मूळचे इंदापूर तालुक्यातील सणसर गावचे आहेत. २००९ च्या IPS बॅचचे अधिकारी असलेले, वैभव निंबाळकर सध्या कचार जिल्ह्याचे एसपी आहेत. वैभव यांनी २००९ मध्ये लोकसेवा आयोगाची परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर, त्यांना भारतीय पोलीस सेवेत अर्थात IPS प्रवेश मिळाला. पहिल्याच प्रयत्नात परीक्षा उत्तीर्ण होऊन त्यांनी देशात २०४ वा नंबर मिळवला.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-‘मेहंदी लगा के रखना’ गाण्याचं इंग्लिश व्हर्जन ऐकून प्रियांका चोप्रा झाली लोटपोट! तुम्ही ऐकलं का?

-‘तेरे चेहरे से नजर नहीं हटती, नजारे हम क्या देखे!’, शालूच्या फोटोने पुन्हा उडवली चाहत्यांची झोप

-पारदर्शी साडीतील ‘तो’ सीन अन् दाऊदसोबतचे नाते, जाणून घ्या मंदाकिनीबद्दल ‘या’ गोष्टी

हे देखील वाचा