Tuesday, July 9, 2024

अखेर प्रतीक्षा संपली! ‘बिग बॉस मराठी’चे तिसरे पर्व ‘या’ तारखेपासून प्रेक्षकांच्या भेटीला

टेलिव्हिजनवरील सर्वांच्या मनावर अधिराज्य गाजवणारा शो म्हणजे ‘बिग बॉस’ होय. या शोला प्रेक्षकांचे अमाप प्रेम मिळत असते. हिंदीमध्ये या शोचे १५ वे पर्व चालू आहे. या शोच्या लोकप्रियतेनंतर हा शो मराठीत देखील आला आहे. मराठीमध्ये बिग बॉसचे २ पर्व पूर्ण झाले आहेत. परंतु कोरोना महामारीमुळे गेले दोन वर्ष बिग बॉसचे तिसरे पर्व आले नाही. खरंतर मराठी बिग बॉसप्रेमी या तिसऱ्या पर्वाची आतुरतेने वाट बघत होते. आता प्रेक्षकांसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. ती म्हणजे बिग बॉसचे तिसरे पर्व लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

मराठी बिग बॉस ३ चा दुसरा प्रोमो प्रदर्शित झाला आहे. कलर्स मराठीच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवरून हा प्रोमो शेअर केला आहे. तुम्ही पाहू शकता की, या प्रोमोमध्ये महेश मांजरेकर दिसत आहेत. ते यामध्ये बिग बॉस मराठीचे तिसरे पर्व कधी येणार आहे, हे सांगताना दिसत आहेत. बिग बॉस मराठी १९ सप्टेंबरपासून सोमवार ते रविवार रोज रात्री ९: ३० वाजता प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. तसेच या शोचे ग्रँड प्रीमियर १९ सप्टेंबरला संध्याकाळी ७ वाजल्यापासून दाखवण्यात येणार आहे. (Marathi bigg Boss season 3 will release on this date, video viral on social media)

हा व्हिडिओ पाहून आता बिग बॉसप्रेमी खूपच खुश झाले आहेत. मागील दोन पर्वाला प्रेक्षकांनी जोरदार प्रतिसाद दिला आहे. मागील दोन्हीही पर्व मराठी दिग्दर्शक, अभिनेते महेश मांजरेकर यांनी होस्ट केले आहेत. आता देखील तेच हे पर्व होस्ट करणार आहेत. मागील २ वर्ष पुढचे पर्व न आल्याने प्रेक्षकांमध्ये नाराजीचे वातावरण पाहायला मिळाले होते, पण आता त्यांच्यामध्ये उत्साहाचे वातावरण दिसत आहे.

बिग बॉसच्या दोन पर्वांमध्ये मराठी चित्रपटसृष्टीतील अनेक कलाकार सामील झाले होते. यामध्ये उषा नाडकर्णी, किशोरी शहाणे, रुपाली भोसले, मेघा धाडे, वीणा जगताप, पुष्कर जोग, शिवानी सुर्वे, सुरेखा पुणेकर, शिव ठाकरे यांसारख्या अनेक कलाकारांचा समावेश होता. बिग बॉसच्या पहिल्या पर्वाची विजेती मेघा धाडे ही होती, तर दुसऱ्या पर्वाचा विजेता शिव ठाकरे हा होता.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-अबब! मौनी रॉयने बिकिनीमध्ये केला इंटरनेटवर कहर, बोल्ड अंदाज पाहून चाहतेही झाले हैराण

-Bigg Boss OTT: शोवर भडकली माजी स्पर्धक सोफिया हयात; म्हणाली ‘करण जोहर सलमान खानपेक्षाही वाईट…’

-जेव्हा शाहरुख खानला महिला चाहती म्हणाली होती, ‘आय लव्ह यू अक्षय’; रंजक आहे ‘तो’ किस्सा

हे देखील वाचा