Thursday, April 24, 2025
Home मराठी विराजस कुलकर्णी आणि शिवानी रांगोळे यांनी गुपचूप बांधली लगीनगाठ? व्हिडिओही आला समोर

विराजस कुलकर्णी आणि शिवानी रांगोळे यांनी गुपचूप बांधली लगीनगाठ? व्हिडिओही आला समोर

छोट्या पडद्यावर ‘झी मराठी’ या वाहिनीवरून प्रसारित होणाऱ्या ‘माझा होशील ना’ या लोकप्रिय मालिकेतील ‘आदित्य’ने घराघरात आपली ओळख निर्माण केली. हा आदित्य म्हणजेच आपला लाडका मराठमोळा अभिनेता विराजस कुलकर्णी (Virajas Kulkarni) होय. ‘माझा होशील ना’ या मालिकेतून विराजसने आपल्या करिअरला सुरुवात केली आहे. तो बऱ्याच दिवसांपासून त्याच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल चर्चेत आहे. तो अभिनेत्री शिवानी रांगोळे (Shivani Rangole) हिला डेट करत असल्याच्या बातम्या समोर येत आहेत.

अलीकडेच विराजस कुलकर्णी आणि शिवानी रांगोळे यांचा साखरपुडा पार पाडला. तेव्हापासून आता त्यांच्या लग्नाच्या बातम्या जोर धरत आहेत. आता नुकतेच विराजस कुलकर्णी आणि शिवानी रांगोळे यांच्या लग्नाचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. त्याचमुळे त्यांच्या चाहत्यांमध्ये या दोघांनी लग्न केले की, काय अशी अटकळ बांधली जात आहे.

अभिनेत्री शिवानी रांगोळे हिने नुकताच सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर केला आहे. ज्यामध्ये शिवानी रांगोळे आणि विराजस कुलकर्णी मुंडावळ्या बांधून गळ्यात हार घातलेली दिसत आहेत. तर विराजस कुलकर्णी शिवानी रांगोळे हिच्या गळ्यात मंगळसूत्र घालताना दिसत आहे. हा व्हिडिओ आता सोशल मीडियावर वाऱ्यसारखा पसरत आहे. चाहते देखील त्यांच्यावर जोरदार प्रेमाचा वर्षाव करताना दिसून येत आहेत. चाहते या व्हिडिओवर प्रचंड लाइक्स व कमेंट्स करत आहेत. मात्र हा व्हिडिओ खरा नसून, त्यांच्या आगामी जाहिरातीचा आहे.

विराजसच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल बोलायचे झाले, तर तो अभिनेत्री मृणाल कुलकर्णी यांचा एकुलता एक मुलगा आहे. त्यासह काही दिवसांपूर्वीच त्याचा साखरपुडा शिवानी रांगोळीसोबत झाला होता. शिवानी रांगोळी ही देखील अभिनेत्री असून, तिने स्टार प्रवाह या वाहिनीवरील लोकप्रिय मालिका ‘बाबासाहेब आंबेडकर’ आणि ‘सांग तू आहेस का?’मध्ये काम केले आहे.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा – 

हे देखील वाचा