Tuesday, July 9, 2024

मुख्यमंत्री उध्दव ठाकरेंच्या संकल्पनेतुन उभे राहणार नाटकांचे संग्रहालय ,सई गोखलेंकडे दिली महत्वाची जबाबदारी

मराठी नाट्य जगतासाठी आणि कलाकारांसाठी एक आनंदाची बातमी सध्या समोर आली असून लवकरच मुंबईमध्ये मराठी नाटकाचा इतिहास सांगणारे भव्यदिव्य मराठी नाट्यविश्व उभे राहणार आहे. मुंबईमधील गिरगाव चौपाटीवर बिर्ला क्रिडा केंद्राच्या जागी हे संग्रहालय उभे राहणार असुन अभिनेत्री सई गोखलेकडे (Sai Gokhale) याबद्दलची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. काय आहे या वास्तूची संकल्पना चला जाणून घेऊ.

अभिनेत्री सई गोखलेने याबद्दल बोलताना मराठी नाट्यविश्वालयात एक थिएटरही असेल आणि अम्पी थिएटरही असेल. यामध्ये मराठी नाट्यसृष्टीवर आधारित तीन गॅलरीज असतील. या तीनही विभागाची डिजायनिंग मी करणार आहे.मी या प्रकल्पाची म्युजिओलिजिस्ट आहे. त्यामुळे या वास्तुमध्ये कोणते कोणते विभाग असतील. त्याची रचना कशी असेल. याचबरोबर प्रेक्षकांच्या आवडीनुसार आतमध्ये प्रवेश केल्यापासून ते बाहेर पडेपर्यंत कशा प्रकारे त्यांना गोष्टी दाखवता येतील याबद्दलची सगळी सगळी रचना करणार असल्याचे सांगितले.

याबद्दल पुढे बोलताना ती म्हणाली की, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या संकल्पनेतून मराठी विश्व वास्तू उभी राहणार आहे. यामध्ये राज्य सरकार आणि मुंबई महानगरपालिका यांचा महत्वाचा सहभाग असणार आहे. हे काम पुर्ण व्हायला अजुन दोन वर्षाचा कालावधी लागणार आहे. सध्या या इमारतीच्या बांधकामाचे बऱ्यापैकी काम झाले आहे.   मी आजच्या पिढीची तरुण प्रतिनिधी असल्याने माझी निवड केलेली असावी. यामुळे माझीही याबद्दलची जबाबदारी वाढणार आहे. दरम्यान अभिनेत्री सई गोखलेने बेफाम, गोदावरी, पिंपळ, दिल, दोस्ती दोबारा या चित्रपटांमध्ये काम केले आहे. आपल्या दमदार अभिनयासोबतच ती आव्हानात्मक भूमिका साकारण्यासाठीही प्रसिद्ध आहे.

हे देखील वाचा