‘धनंजय माने इथेच राहतात का?’ हे वाक्य ऐकले की डोळ्यासमोर येतो तो मराठी चित्रपटांमधील एक असा सिनेमा ज्याला आजही कोणतीच तोड नाही. जेव्हा कधी मराठी चित्रपटांच्या इतिहासाबद्दल बोलले जाईल, लिहिले जाईल तेव्हा तो इतिहास एका चित्रपटाच्या उल्लेखाशिवाय नेहमीच अपूर्ण असेल. हा सिनेमा आहे, मराठी सिनेसृष्टीतील लोकप्रियतेचे, प्रसिद्धीचे शिखर रचणारा, विनोदाला एक नवीन अर्थ, नवीन रूप देणारा असा ‘अशी ही बनवाबनवी.’ या चित्रपटाने लोकप्रियतेचे शिखर गाठले. नुकतेच या चित्रपटाला प्रदर्शित होऊन ३३ वर्ष पूर्ण झाले. २३ सप्टेंबर १९८८ साली हा सिनेमा प्रदर्शित झाला होता. आज इतक्या वर्षांनंतरही हा चित्रपट बघताना कोणालाही अजिबात कंटाळा येत नाही. ३३ वर्षांनंतरही या चित्रपटाची जादू यत्किंचितही कमी झालेली नाही, किंबहुना ती अधिकाधिक वाढतच आहे.
या चित्रपटाला ३३ वर्ष पूर्ण झाल्याबद्दल या चित्रपटाचे दिग्दर्शक असणाऱ्या सचिन पिळगावकर यांनी त्यांच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये त्यांनी बनवाबनवीच्या संपूर्ण टीमचा ब्लॅक अँड व्हाइट फोटो पोस्ट करत लिहिले, “सोनेरी आठवणींचे ३३ वर्ष.” या फोटोमध्ये सर्वच कलाकार अतिशय तरुण दिसत आहे. या सिनेमाबद्दल काय आणि किती बोलावे.
आजही हा सिनेमा टीव्हीवर लागला की, सर्वच जणं टीव्हीसमोर बसतात, आणि चित्रपटाच्या प्रत्येक संवादासोबत स्वतःही कलाकारांसोबत संवाद म्हणतात. आजही या चित्रपटातील संवादांनी प्रेक्षकांच्या मनात घर केले आहे. प्रेम आणि मैत्रीला या दोन नात्यानं खऱ्या अर्थाने आणि उत्तम पद्धतीने पडद्यावर उतरवणारा हा सिनेमा म्हणजे मराठी सिनेसृष्टीतील सोनेरी पानंच जणू.
एकतीस वर्षांपूर्वी प्रदर्शित झालेल्या या सिनेमातील संवादांवरून आजही मिम्स बनवले जातात. या सिनेमांतील संवाद सर्वांनाच तोंडपाठ आहेत. सचिन आणि सुप्रिया पिळगावकर, लक्ष्मीकांत आणि प्रिया बेर्डे, अशोक सराफ आणि अश्विनी भावे, सुशांत रे आणि निवेदिता सराफ या सर्वानी मिळून प्रेक्षकांना बघणारा पोट धरून हसवले नव्हे नव्हे आजही हसवत आहे. ३३ वर्षांपूर्वी या सिनेमाने ३ कोटी रुपयांचा व्यवसाय केला होता. या चित्रपटाची सर्वात मोठी खासियत म्हणजे यातील संवाद अतिशय साधे आणि रोजच्या बोलण्यातला वाक्यांनी या सिनेमात धमाल उडवून दिली. संवादाचे टायमिंग, कलाकारांचा अभिनय यामुळेच अगदी साधी आणि सोपी कथा असणाऱ्या या सिनेमाने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवले.
दैनिक बोंबाबोंचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-
-किर्तनकार शिवलीला पाटील बिग बाॅस मराठीच्या घराबाहेर? पाहा काय आहे नक्की प्रकरण
-पर्सच्या निमित्ताने पुन्हा रंगला अनुपम खेर आणि त्यांच्या आईमध्ये मजेशीर संवाद
-‘या’ कलाकारांनी बिग बॉसमध्ये सहभागी होण्यासाठी निर्मात्यांकडून घेतले होते बक्कळ पैसे