Tuesday, December 17, 2024
[aioseo_breadcrumbs]

‘तू तर माझ्यासाठी क्रिकेटचा देव होतास! मग तू असं का केलंस म्हणत ‘या’ प्रसिद्ध दिग्दर्शकाने साधला सचिन तेंडुलकरवर निशाणा

दिल्लीमध्ये मागच्या अनेक दिवसांपासून शेतकरी आंदोलन सुरु आहे. हे आंदोलन आंतरराष्ट्रीय स्तरावर देखील गाजत असताना पॉप सिंगर रिहानाने या आंदोलनाला पाठिंबा देत असल्याचे ट्विट केले, तिचे हे ट्विट पाहून काही आंतरराष्ट्रीय सेलिब्रिटीनी या आंदोलनाला पाठिंबा दिला. या कलाकारांना उत्तरं देताना अनेक भारतीय सेलिब्रिटींनी ट्विट करायला सुरुवात केली. यात मनोरंजन , खेळ आदी क्षेत्रातील दिग्गजांचा देखील समावेश होता. यात मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने देखील ट्विट करत त्याचे मत मांडले होते. पण आता सचिनच्या ट्विटवर जोरदार नाराजी व्यक्त केली आहे.

सचिन तेंडुलकरने त्याचे ट्विट करताना लिहिले, ” ”भारताच्या सार्वभौत्मासंदर्भात कसल्याही प्रकराची तडजोड केली जाऊ शकत नाही. भारताच्या अंतर्गत बाबतीत बाहेरील शक्ती केवळ प्रेक्षक असू शकतात, ते याचा भाग होऊ शकत नाहीत. भारतातील नागरिक भारताला चांगले ओळखतात, यामुळे त्यांनीच भारतासंदर्भात निर्णय घ्यायला हवेत. देश एकसंध रहायला हवा.” सचिनच्या या ट्विटनंतर मराठी सिनेसृष्टीतील दिग्दर्शक समीर विध्वंसने सचिनवर टीका करत एका ट्विट केले आहे.

समीर विध्वंसने तिच्या ट्विटमध्ये म्हटले की, “सचिनची बॅटिंग बघत लहानाचा मोठा झालो! तो माझ्यासाठी क्रिकेटचा देव होता! आयुष्यात अनेक निराश क्षणी मी त्याच्या इनिंग्ज बघायचो, खूप बरं वाटायचं. त्याच्या अनेक गोष्टी मनाला पटल्या नाहीत पण हे कधी बदललं नव्हतं. पण आता मात्र इथून पुढे सगळं वेगळं असेल. राग येतोचं पण वाईट जास्त वाटतंय.”

सचिनवर टीका केल्यामुळे समीर विध्वंस यांना देखील मोठ्या टीकेला सामोरे जावे लागले आहे. त्यांनाही नेटकऱ्यांनी मोठ्या प्रमाणावर ट्रोल केले. यामुळे समीर यांनी ट्विटरवरील रिप्लायचा पर्यायच बंद केला आहे. याला अनुसरून त्यांनी पुन्हा एका ट्विट केले आहे. त्यांनी लिहिले, “मी सभ्य भाषेत माझी मतं मांडतो. सभ्य भाषेतच मांडत राहणार! तरीही त्यावर अर्वाच्य भाषेत अंगावर धाऊन येतात लोक.म्हणून रिप्लाय बंद करावे लागतात. माझ्या मतांशी सहमत नका होऊ, आग्रह नाहीचे. पण सभ्यता का सोडता?! मग अश्यांना ब्लॉक करावं लागतं. आणि ते मी करणार! सभ्यपणे मतमतांतरं असूदेत की.”

त्यांनी अजून एका ट्विट करत या ट्विटमध्ये शेतकरी आंदोलनाला रोखण्यासाठी अश्रूधूर, लाठ्या, आणि ठोकलेले खिळे तुम्हाला पटतात का? अंतर्गत प्रश्न सोडवण्यासाठी भारत अशाप्रकारे समर्थ आहे का ? असा प्रश्न विचारला आहे. त्यांनी लिहिले ” भारताबाहेरच्या लोकांनी ‘आपल्या’ अंतर्गत मामल्यात बोलायची गरज नाही, तुमचं मत. चला ठीक! तुम्हाला सरकारची बाजू पटत्ये. ओके! तरीही ‘आपल्याच’ शेतकऱ्यांना आंदोलनापासून रोखण्यासाठी अश्रूधूर, लाठ्या,बांधलेल्या भिंती आणि ठोकलेले खिळे तुम्हाला पटतात का?! ‘भारत समर्थ आहे’ असा??!!

समीर विध्वंस यांनी आनंदी गोपाळ आणि धुरळा यांसारख्या सुपरहिट आणि दर्जेदार मराठी चित्रपटांचे दिग्दर्शक
केले आहे.

हे देखील वाचा